अनाथांना भिक्षा वाम मार्ग नव्हे , वारकरी शिक्षणातून ज्ञानाची दिक्षा देणारा अवलिया !
युवा किर्तनकार स्वप्नील महाराज आळंदीकर वाढदिवस विशेष
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालक्यातील लोहारखेडा गावातील वारकरी कुटुंबातील एक छोटासा बालक ज्ञानाची नगरी आळंदी येथे वारकरी शिक्षणासाठी जाऊन शिक्षण पूर्ण झालेवर गावाकडे न येता तेथेच राहून त्याच्यासारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाचे दरवाजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे हे ध्येय उराशी बाळगून त्याने तेथे श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची जिल्हा पुणे ही संस्था काढली आणि आज येथे हा नवतरुण अगदी कमी वयाचा युवा कीर्तनकार शेकडो मुलांची पटसंख्या घेवून वारकरी शिक्षण देत आहे. याच सोबत या नवख्या मुलाने पुणे परीसरात स्वतः ची अशी प्रामाणिक ओळख निर्माण केलेली असून परीसरात लाखो रुपयांचे इव्हेण्ट प्रोग्राम चे मॅनेजमेंट याच मुलाकडे असते. नव्हे नव्हे झी मराठी, मी मराठी, शेमरू मराठी या न्युज चॅनेलवर येणाऱ्या कीर्तन महोत्सवात देखील मॅनेजमेंटची जबाबदारी यानेच पार पडली आहे. नुकतेच याच मुलाने आदिशक्ती मुक्ताई यांच्या परम पवित्र चरण कमलानी पुनित झालेल्या भूमीत म्हणजे तिर्थक्षेत्र कोथळी येथे आयोजित “भव्य बाल वारकरी सुसंस्कार” शिबिराच्या माध्यमातून बालकांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण होऊन एक चांगली पिढी समाजाला निर्माण करण्याचा आदर्श कार्यक्रम घेतला अशा ह.भ.प युवा किर्तनकार, संगितप्रेमी स्वप्निल महाराज आळंदिकर याचा आज वाढदिवस याबद्दल त्यांस मनःपूर्वक शुभेच्छा!
ठरतोय अनाथ बालकांसाठी अवलिया :
एरव्ही आई वडील नसलेल्या अनाथ बालकांचे काय होते हे आपण नेहमी पाहतोच अशी बालके चुकीच्या दिशेला लागली की व्यसन , चोरी व गुन्हेगारी कडे आपोआप खेचली जातात. अशा मुलांना वयाच्या वळणावर योग्य मार्गदर्शक न लाभल्याने होत असते. आळंदी येथे वारकरी शिक्षण घेत असताना अनेक वेळा पुणे येथे कार्यक्रमासाठी जात असताना स्वप्नील महाराज यांना अनेक ठिकाणी अनाथ मुले भिक्षा मागत असताना दिसली हे पाहून त्याला खूप वाईट वाटले . पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर याच मुलांचं भवितव्य वारकरी संप्रदायात घडवायचे तसेच मुक्ताई च्या भूमीतील हजारो मुलांनी वारकरी शिक्षणाकडे वळावे हे ध्येय उराशी बाळगून यांनी स्वतः ची वारकरी शिक्षण संस्था काढली. यांनी स्वतः ची आर्थिक परिस्थिती नसताना देखील काही स्पॉन्सर दाते यांच्या मदतीने आज घडीला या तरुणाने किमान १० अनाथ मुलांना स्वतः च्या संस्थेच्या माध्यमातून वारकरी शिक्षण देऊन भविष्यातील आदर्श कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य , टाळकरी घडविणार आहे. त्यामुळे अशा अनाथ बालकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा अवलिया आहे. अशा अवलिया स्वप्नील महाराज यांच्या कार्यास आदिशक्ती मुक्ताई सहाय्य भूत होवो व त्याचे कार्य सदा सर्वदा सिद्धीस जावो याच सदिच्छा !