Cough Home Remedies: गेल्या दोन दिवांपासून थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या (Cough) रुग्णंख्यात वाढ झाली आहे. सर्दी खोकला ही सामान्य समस्या असली तरी यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. वातावरणातील बदल, थंड किंवा आंबट पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ही समस्या निर्माण होते. काहींना तर कोणताही ऋतु असो खोकल्याची (Cough Problem) समस्या कायम असते. तुम्ही देखील या समस्येने ग्रस्त असाल तर काळजी करु नका. या लेखात आपण खोकल्याच्या समस्येवरील काही घरगुती उपायांविषयी बोलणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती.
आले
आयुर्वेदात आल्याचे अनेक औषधी उपयोग सांगण्यात आले आहे. सर्दी खोकल्याच्या समस्येवर आले प्रभावी ठरते. आल्यामध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे घशातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
मध
मध हे अनेक औषधी गुणधर्मांनी संपन्न आहे. तुम्हाला वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही मधाचा वापर करावा. रात्री मधाचे सेवन केल्यास खोकला कमी होत आराम मिळतो.
मिठाचे पाणी
सर्दी-खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास तुम्हाला आराम मिळत. काही दिवसातच खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत होते. मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करणे हा प्रभावी घरगुती उपाय आहे.
वाफ घ्या
हिवाळ्यात वातावरणातील बदल तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी-खोकल्याचा जास्त त्रास होतो. अशात तुम्ही वाफ घेणे सुरू करू शकता. वाफ घेतल्याने सर्दीची लवकर बरी होण्या मदत होते.
पाणी
तुम्हाला नेहमी सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर तर तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. यामुळे श्लेष्मा पातळ होतो आणि तो तोंडातून व नाकातून सहज बाहेर पडतो.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)