Health Risk: कोणतीही भाजी असो की एखाद्या स्नॅक्सची चव वाढवायची असो टोमॅटोचा वापर केला जातो. प्रत्येक किचनमध्ये टोमॅटोचा वापर (Tomato Use) केला जातो. दैनंदिन जीवनात रोज वापरली जाणारी भाजी म्हणजे टोमॅटो. जी आरोग्यासाठी (Tomato Benifits) खूप फायदेशीर मानली जाते. त्वचेच्या समस्येत (Tomato For Skin) देखील टोमॅटो उपयोगी ठरतो. कारण त्यात अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण मुबलक आहे. या उपायामुळे त्वचा सुंदर होत सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारी समस्या दूर होते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? टोमॅटोचे जास्त सेवन आरोग्यासाठी हनीकारक ठरतं. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणत्या समस्या (Tomato Side Effect) निर्माण होतात.
अतिसार
टोमॅटो ही अशी भाजी आहे जीचा वापर सर्वच ऋतूंमध्ये केला जातो, मात्र पावसाळ्यात टोमॅटोचा थोडा जपून वापर केला पाहिजे. कारण टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा जीवाणू असतो. हा जीवाणू पोटात गेल्यावर विष निर्माण करतो. यामुळे अतिसार हा आजार होतो.
सांधे दुखी
हल्ली सांधे दुखीची समस्या अनेकांना उद्भवत आहे. तरूणाई देखील सांधे दुखीमुळे त्रस्त आहे. अनियमित जीवनैली आणि जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन याला कारणीभूत ठरत आहे. टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने शरीरात सोलॅनिन नावाचा क्षार आढळून येते. सोलॅनिनमुळे स्नायूंमध्ये घाण रक्त जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज येण्याची समस्या निर्माण होते.
किडनी प्रोब्लेम..
कॅल्शियम आणि ऑक्सलेटचे भरपूर प्रमाण टोमॅटोमध्ये अढळतात. मात्र हे घटक शरीराला मर्यादित प्रमाणात हवे. जास्त प्रमाण हे घटक शरीराला घातक ठरतात. टोमॅटोचे अतिसेवन केल्याने शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढत किडनी स्टोनची समस्या निर्माण होते.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)