Jyotish Tips : हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अतिशय प्रचीन असे हे शास्त्र असून व्यक्तिच्या जिवनाशी संबंधीत अनेक गोष्टी यात सांगण्यात आल्या आहे. ज्येतिष शास्त्रात बुधवार संबंधी काही उपाय सांगण्यात आले आहे. हा दिवस भगवान गणपतीला समर्पित आहे. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने (Ganesh Poojan Vidhi) होते. ज्योतिष शास्त्रानुसार, (Jyotish Tips) बुधवारी गणपती पूजनासह काही उपाय करणे लाभदायक ठरतं. या दिवशी उपायासह काही चुका टाळल्या पाहिजे. त्यानुसार जाणून घेऊया अधिक माहिती.
बुधवारी टाळा या चुका
मुलींचा अपमान टाळा
सनातन हिंदू धर्मात कन्याला देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे कन्या पूजनाला महत्त्व आहे. तुम्हाला माता दुर्गाचा अर्शीवाद हवा असेल तर बुधवारी चुकूनही मुलींचा अपमान करू नका. बुधवारी लहान मुलगी दिसली तर तिला काहीतरी भेटवस्तू द्या. याशिवाय तृतीय पंथी दिसल्यास त्यांना देखील भेट वस्तू द्यावी.
दूध जाळू नका
आयुष्यातील ताण-तणाव कमी करायचा असेल तर बुधवारी दूध जळणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मूग डाळ, कोथंबीर, पालक, हिरवी मिरची, पपई आणि पेरू खरेदी करू नये. याशिवाय केसांशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी किंवा विक्री करू नये. असे केल्यास व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात.
प्रवास टाळा
ज्यातिष शस्त्रानुसार, बुधवारी कोणत्याही प्रकारचा प्रवास हानिकारक ठरू शकतो.तुमच्या कुंडलीत बुध अशुभ असेल तर अपघात किंवा कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रवास टाळावा. विशेषतः या दिवशी पुरुषांनी सासरवाडीला जाऊ नये. याशिवाय बुधवारी आत्या, मेव्हणी, विवाहित बहिण-मुलीला घरी बोलावू नये. तसेच नवीन शूज आणि कपडे खरेदी टाळा.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)