Republic Day 2023 : आपला भारत देश आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला. भव्य अशा या सोहळ्याप्रसंगी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Egypt President Abdel El Sisi) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात देशाचे नेतृत्व करत आहेत. भव्य आशा या कार्यक्रमात कर्तव्य पथावर परेड सुरू असून, या ठिकाणी देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्यतेची पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
Delhi | Marching on the Kartavya Path for the first time is the combined band and marching contingent of the Egyptian Armed Forces. The contingent is being led by Colonel Mahmoud Mohamed Abdel Fattah El Kharasawy.#RepublicDay pic.twitter.com/0EBm2QOAOw
— ANI (@ANI) January 26, 2023
राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर 21 तोफांची सलामी देऊन राष्ट्रगीत झाले. प्रथमच, 105 मिमी भारतीय फील्ड गनमधून 21 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी जुन्या 25 पाउंडर गन ऐवजी 105 मिमी भारतीय फील्ड गनने सलामी दिली, जी संरक्षण क्षेत्रातील वाढती ‘आत्मनिर्भरता’ दर्शवते.
दिल्लीत तगडी सुरक्षा व्यवस्था
प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानीत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांतर्फे हानिकारक कारवाया रोखण्यासाठी तपासणी व गस्त घालत आहे. सुमारे 6,000 सुरक्षा कर्मचारी तैनात आहे. यासह कार्यक्रमाच्या अभ्यागतांसाठी नवी दिल्ली जिल्ह्यात हेल्प डेस्क उभारले आहे. यासह बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथके बाजारपेठा, गजबजलेल्या भागात आणि इतर महत्त्वाच्या भागात तपासणी करत आहेत. एकंदरीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.