निधन वार्ता : स्व.विजय वामन पाटील यांच दुःखद निधन
मृत्यूशी झुंज अखेर ठरली अपयशी !
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन १०२९ जळगांव विभागातील सदस्य
मुक्ताईनगर रहिवासी कै विजय पाटील यांचा दिनांक २३/०५/२०२५ रोजी दुपारी रोड अपघात झाला होता. योगायोगाने त्यांच्या मागून जळगाव हून येत असलेल्या मुक्ताईनगरचे पत्रकार मुकेश महल्ले यांना साकेगाव ता.भुसावळ जवळ हा अपघात झालेला दिसला . त्यांनी वाहन थांबवून पाहिले तर ही व्यक्ती आधार कार्ड ओळखपत्रावरून मुक्ताईनगरची असल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच स्थानिक मदतीच्या सहाय्याने रुग्णवाहिका मागविली व अपघात ग्रस्त विजय पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगांव येथील न्युकलियस हाॅस्पिटल येथे हलविण्यात आले होते… परंतु काळाला काही वेगळेच मान्य होते त्यांचे शरीर औषधोपचारास प्रतिसाद देत नसल्याने सर्वञ चिंतेचे वातावरण होते…कै विजय पाटील यांची मुत्युशी झुंज सुरु असतांना काल राञी दिनांक २६/०५/२०२५ सोमवार रोजी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना…!🙏 पाटील परिवाराच्या दु:खात तांत्रिक परिवार सहभागी आहे
ओम शांती शांती शांती :
अंत्यविधी याञा आज दिनांक २७/०५/२०२५ मंगळवार रोजी त्यांच्या मुक्ताईनगर येथील शिवरायनगरातील जिजाऊ कॉलनी मधील रहाते घरापासून वेळ स. ११ ठीक वाजता निघणार आहे.