जयपाल बोदडे यांची मुक्ताईनगर भाजप तालुका अध्यक्षपदी नियुक्ती; आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर येथे भाजपच्या तालुका अध्यक्षपदी जयपाल बोदडे यांची नियुक्ती करण्यात आली असून या खास नियुक्तीचे, आमदार निवासस्थानी आ. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठळक घडामोडी :
• जयपाल बोदडे यांची भाजप तालुका अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती
• आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
• भाजपा नेते प्रफुल जावरे व नगरसेवक राजेंद्र हिवराळे यांची विशेष उपस्थिती
सविस्तर माहिती :
भाजप पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी व तालुक्यातील पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जयपाल बोदडे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर तालुक्यात भाजपच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जयपालभाऊंना शुभेच्छा देताना म्हटले, “आपण सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाचे कार्य अधिक जोमाने वाढवाल, अशी अपेक्षा आहे.”
या कार्यक्रमाला भाजपा नेते प्रफुल जावरे आणि नगरसेवक राजेंद्र हिवराळे यांचीही उपस्थिती लाभली.
या निमित्ताने मुक्ताईनगर तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. जयपाल बोदडे यांच्या नेतृत्वात आगामी काळात भाजपची घोडदौड अधिक भक्कम होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
#महायुती #मुक्ताईनगर #भाजप #Shivsena #BJP #अभिनंदन #ChandrakantPatil