भंडारा, 9 एप्रिल (हिं.स.)। भंडारा जिल्ह्याच्या बपेरा येथील देशसेवेत रुजू असलेली दोन भावंडे अनिल कावळे आणि गोपाल कावळे यांनी आई नीला कावळे यांच्या निधनानंतर एक सामाजिक उदाहरण समाजापुढे ठेवले. ६ एप्रिल २०२५ ला कावळे बंधू यांची आईचे दुःखद निधन झाले होते, त्यांच्या स्मरणात मुलांनी समाजातील जुन्या रूढी परंपरा ना मात देत एक समाजोपयोगी निर्णय घेतला आणि बपेरा येथील महात्मा जोतिबा फुले अभ्यासकेंद्राला ५१ हजारांची मदत केली.
समाजात रुजू असलेली जुनी परंपरा म्हणजे आपल्या कुटुंबात जर कुणाचाही निधन होतो तर आपल्याकडे परंपरा असते की त्या व्यक्तीच चौदावी कार्यक्रम केले जातो परंतु या कावळे भावंडांच्या मते या सृष्टीतलावर जन्म आणि मृत्यू ही निश्चित अशी एक गोष्ट आहे आणि हे सर्व सृष्टितलावर कुणीही थांबवू शकत नाही, पण मात्र त्यांचे विचार व कार्य हे अविरत कार्यशील असतात व ते सदैव टिकून राहतात, म्हणुन या भावंडांनी ५१ हज़ार रूपयांचा चेक वाचनालयातील मुलांच्या अभ्यासासाठी आणि त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी दान स्वरूप दिला.