पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)।
उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत असतानाच आता महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे.नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो,
त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत