कृषी मंत्री ना.अब्दुल सत्तार यांची मुक्ताईनगर येथे धावती भेट !
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सी एम व्ही रोगाने ग्रस्त केळी उत्पादक बळीराजाला नुकसान भरपाई सह मतदार संघात कृषी संशोधन केंद्र उभरण्याची केली मागणी !!
मुक्ताईनगर : राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दूल सत्तार हे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे कृषी अभियानाला जात असताना मुक्ताईनगर मार्गे आले असता त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पाटील यांनी मतदार संघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सिएमव्ही आजाराबाबत चर्चा केली व झालेल्या नुकसानी पोटी तात्काळ भरपाई मिळणे संदर्भात मागणी केली तसेच मुक्ताईनगर मतदार संघात नवीन कृषी संशोधन केंद्र उभारण्याची देखील मागणी केली.
याबाबत, आज दि.३१ ऑगस्ट बुधवार रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे असलेल्या कृषी अभियानाला राज्याचे कृषी मंत्री ना. अब्दुलजी सत्तार हे मुक्ताईनगर मार्गे जात असताना त्यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा सत्कार केला.प्रसंगी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी कृषी मंत्री सत्तार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना मतदार संघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या जैन टिश्यू रोपावरील सी एम व्हि आजाराबाबत माहिती दिली व यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला असून ऐन हाता तोंडाशी येणारा घास हिरावून घेतला जात असल्याने बळीराजा प्रचंड चिंतेत असल्याचे कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी तसेच सी एम व्ही आजार हा जैन टिश्यू रोपांवरच येत असल्याने हा प्रादुर्भाव केवळ एकाच रोप प्रणालीवर का होत आहे.यासाठी सखोल चौकशी होणे साठी एक समिती नेमण्यात यावी अशी मागणी केली. आणि विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र हे जळगाव ला आहे. हे चार पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना प्रचंड गैरसोयीचे होत असल्याने मुक्ताईनगर मतदार संघात
सोयीचे होईल असे नवीन कृषी संशोधन केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बैठकीत केली. सदरील मागण्या व चर्चा यास कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सकारात्मकता दाखविली आहे. त्यामुळे सी एम व्ही आजाराने त्रस्त असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकणार आहे.