अमरावती, 18 मार्च (हिं.स.) : बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या बाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा अमरावती दौऱ्यावर येत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या दालनात बैठक घेतली… यात त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष करत यासंदर्भात ते सहकार्य करत नसल्याचं त्यांनी म्हटलं, तसेच अमरावती जिल्ह्यात 15 हजार जन्म प्रमाणपत्र पैकी आठ हजार जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीर रित्या नायबतहसीलदारांनी सुनावणी केली असा आरोप केला, तर राज्यात 40 हजार बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
अमरावती, यवतमाळ, नागपूर व अकोला या विदर्भातील चार जिल्ह्यातील 32 तालुक्यातील 19हजार 762 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र आहे.. अमरावतीमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र बाबद १०० गुन्हेगारांची यादी मी आधीच पोलिसांना दिली, महसूल विभागाच्या संगनमताने हा घोटाळा झाला असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला, तर बांगलादेशी रोहिंग्या यांना बनावट जन्म प्रमाणपत्र बाबत महाराष्ट्रात एकूण 20 ठिकाणी गुन्हे दाखल झाले अशी माहिती देखील सोमय्या यांनी दिली. नागपूर हिंसाचारावर आपली प्रतिक्रिया देत किरीट सोमय्यांम्हणाले कि “औरंगजेबाचे कौतुक सहन करणार नाही”नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज १८ मार्च रोजी अमरावती दौऱ्यावर असताना प्रतिक्रिया दिली.
त्यांनी विरोधकांवर टीका करताना औरंगजेबाच्या कौतुकाला तीव्र विरोध दर्शवला.सोमय्या म्हणाले, काही लोकांना औरंगजेबाला हिरो बनवायचं आहे, पण महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही. औरंगजेब हा एक क्रूर राजा होता. त्याची कबर वास्तू म्हणून जपली जात आहे, पण त्याचे कौतुक आम्ही सहन करणार नाही.ते म्हणाले की, “सरकारच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे काही गोष्टींचं रक्षण करावं लागतं. पण मंत्र्यांनी या विषयात संतुलन ठेवण्याची गरज आहे.यासोबतच त्यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या गुंडांवरही कडक शब्दांत हल्ला चढवला. “मुस्लिम समाजातील गुंडांनी लक्षात ठेवावं, वो दिन अब गये…” असे ते म्हणाले.