नवी दिल्ली, 28 मार्च (हिं.स.) : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 2 टक्के वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के होईल.
यापूर्वी जुलै 2024 डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ केल्याने त्याचा फायदा 68 लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 42 लाख पेन्शनधारकांना होईल. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देणारा आणि त्यांचे वेतन राहणीमानाच्या वाढत्या खर्चाशी सुसंगत राहावे, यासाठी दिला जाणारा आर्थिक लाभ समजला जातो. —————————