अमरावती, 6 मार्च (हिं.स.)
ऐरवी, लाच घेताना अटक… अशीच कार्यवाही होते.. आणि अशाच बातम्याऐकतोववाचतो. पण, धामणगाव रेल्वे तालुक्यात बुधवारला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अगदीया उलट, लाच देणारा तेवढाच गुन्हेगार… हे वाक्य खरे ठरवत ऐतिहासिक व धक्कादायक कार्यवाही करीत सरपंचाना लाच देणारे दोन शासकीय कंत्राटदारांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
रोडचे निकृष्ट काम केल्यानंतर कंत्राटदारां विरुद्ध बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतकडून प्रमाणपत्र देताना अडचण निर्माण करू नये, यासाठी हिंगणगावचे सरपंचांना २० हजार रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखविले. या प्रकरणी सरपंचानी आमिषाला बळी न पडता, एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एसीबीने बुधवारला ग्रामपंचायत कार्यालयातच सापळा रचून शासकीय कंत्राटदार मनिष नरेंद्र श्रीखंडे आणि शासकीय कंत्राटदार सुदेश मेघाणी या दोघांना सरपंच ठाकुर यांना २० हजारांची लाच देताना ताब्यात घेतले. लाचखोरीच्या प्रकरणात प्रथमच लाच घेणाऱ्या ऐवजी लाच देणाराच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शासकीय कंत्राटदार मनिष नरेंद्रराव श्रीखंडे (२९ वर्षे, केदारेश्वर मंदीर रोड केदार चौक वरूड, जि. अमरावती आणि सुदेश भरत मेघाणी, वय ३२ वर्षे, व्यवसाय शासकिय कंत्राटदार, रा. यशवंत बाबा कॉलनी, अमरावतीरोड वरूड यांना मौजे ग्रामपंचायत हिंगणगाव येथील रस्ता तयार करण्याचे काम करण्याचे काम मिळाले होते. या दोन्ही कंत्राटदारांनी हे काम १५ दिवसापुर्वी सुरू केले. मात्र रस्त्याचे काम शासनाच्या नियमाप्रमाणे न केल्याने हिंगणगावचे सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकुर यांनी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारदार यांनी यातील आरोपीने निकृष्ट काम केल्यामुळे तक्रारी मागे घ्याव्या. आणि कामकाज पुर्ण झाल्यावर ग्रामपंचायत कडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रामध्ये अडचणनिर्माणकरूनयेयासाठी कंत्राटदार श्रीखंडे यांनी तक्रारदार सरपंच ठाकुर यांना लाच रक्कम म्हणून २०,००० रु. आमिष देण्याचे मान्य केले.
तसेच आरोपी कंत्राटदार मेघाणी यांनी लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सरपंच ठाकुर यांनी या प्रकरणी अमरावती एसीबीकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत एसीबी पथकाने बुधवार ५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय हिंगणगाव येथे सापळा रचला. यावेळी कंत्राटदार मनिष श्रीखंडे आणि सुदेश मेघाणी यांनी पंचासमक्ष सरपंच ठाकुरयांना २०,००० रुपये लाचरक्कमदिल्याने तत्काळ या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांचेविरूध्द दत्तापुर पोलीस ठाणे, अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याचीप्रक्रिया सुरु आहे. ही कार्यवाही एसीबीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक मंगेश मोहोड, यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि. संतोष तागड, तसेच पो.नि. केतन माजरे, पो.हवा. प्रमोद रायपुरे, पोहवा. युवराज राठोड, पोहवा. राजेश मेटकर, पोलीस अंमलदार शैलेश कडु, अमलदार वैभव जायले, चालक पोउपनि. सतिश किटुकले, चालक पोहवा गोवर्धन नाईक यांनी पार पाडली.