भंडारा, 10 मार्च (हिं.स.)।
लाखनी येथील पोलीस कर्मचारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर पेट्रोलींग करीत असताना एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहनात जनावर वाहतुक करीत असल्याचे आढळून आल्याने चालकास थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने त्याचे ताब्यातील बोलेरो पिकअप भरधाव वेगाने पळविले. त्याचा पाठलाग केला असता चालकाने त्याचे ताब्यातील वाहन मौजा गडेगाव शेतशिवारात थांबविले.
चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत तुळशीराम नगरकर, २७ वर्षे, रा. संजय नगर लाखनी असे सांगितले. त्याचे ताब्यातील बोलेरो पिकअप चारचाकी वाहनाची पाहणी केली असता त्यात टॅगींग नसलेले १३ गोवंशीय जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने कोंबून कृरतेची वागणूक देऊन कत्तलखान्यात नेण्याचे हेतूने अवैधरित्या मिळून आले . पोलिसांनी 13 जनावरांची सुटका करत गाडी सह चालकाला अटक केली आहे.