मालेगाव, 14 मार्च (हिं.स.) : शहरात बनावट जन्मदाखल्यातील सुमारे तीन हजार दाखले रद्द करण्यात आले आहेत. एक हजार जन्मदाखले काढताना अपूर्ण व खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली. एक हजार दाखले घेतलेले फरारी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकातर्फे (एसआयटी) होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
किरीट सोमय्या हे सायंकाळी येथे आले. बांगलादेशी व रोहिंग्यांच्या पुतळ्यांचे दहन होळीत केले आहे.कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. तत्पूर्वी, त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, तहसीलदार विशाल सोनवणे आदींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवा पाटील, दीपक पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, की मालेगावात एक हजार जन्मदाखल्यांचा तपास गतीने सुरू आहे. जन्मदाखले घेताना संबंधितांनी बनावट व खोटी कागदपत्रे दिली. यात महापालिका, तहसील कार्यालय व धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले घेतलेले जवळपास हजार जण बेपत्ता आहेत ते पळून गेले आहेत हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगून राष्ट्रीय तपास संस्था व दहशतवाद विरोधी पथक याबाबत अधिक तपास करीत आहे.
दरम्यान माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव मध्ये होळीच्या निमित्ताने बांगलादेशी रोहिंगटांची प्रतीकात्मक होळी जाळली असून मनोभावे त्यांनी होळीची पूजा देखील केली.