हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला : घातपाताचा संशय
मुक्ताईनगर : शहरातील गौतम देवचंद बोदडे (वय ६५ वर्षे, रा. आंबेडकरनगर ता. मुक्ताईनगर) यांचा मृतदेह मुक्ताईनगर शेती शिवारातील तुकाराम मधुकर खडसे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
गुरुवार दि. २७ रोजी त्यांच्या हरविल्याची नोंद मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आली होती. दरम्यान गौत बोदडे यांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान यासंदर्भात, गौतम बोदडे यांचा नातू अभय कुवरसिंग बोदडे (रा.आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या खबरीनुसार, मयत गौतम देवचंद बोदडे हे बुधवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेपासून २८ एप्रिल रोजीच्या सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हरवले होते. परंतु त्यांचा मृतदेह
दि. २८ रोजी मुक्ताईनगर शिवारातील तुकाराम खडसे यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली आढळून आले आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहेत. दरम्यान, मयताचा मोबाईल, मृतदेह ज्याठिकाणी आढळले तेथून लांब आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मात्र शहरात व परिसरात खळबळ उडाली आहे.