सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव च्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी कु. संजनाताई चंद्रकांत पाटील यांनी यशस्वी पणे पाडली पार !
जळगाव : जळगाव शहरात गेल्या पंचवीस वर्षांपासून दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व जाती धर्मातील समाज बंधू भगिनी यांना एकत्रित करून मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते अतिशय थाटात निघणाऱ्या या शोभायात्रेचे येथे अद्भुत असे नियोजन असते. तसेच येथे यंदा मराठा प्रीमियर लिंग तर्फे आयोजित कार्यक्रमाचे टशन सुरू असून विविध कार्यक्रमांनी शिवजयंती महोत्सव कार्यक्रमात रंगत आलेली आहे. या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षपदी मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कु. संजनाताई चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती शिवजयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आलेली होती. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनात यशस्वीपणे सहभाग नोंदवून सकाळपासून त्या कार्यक्रमात उपस्थित होत्या त्यांचेसह तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितलताई शिवराज मालुसरे, जामनेर नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, सौ.सीमाताई सुरेश भोळे, सौ लिनाताई पवार, श्रीमती रश्मीताई हिरेश कदम आदी प्रमुख मान्यवरांसह शिवजयंती उत्सवाचे निमंत्रण नियोजन समितीचे सुरेशजी पाटील, रामदादा पाटील, सुरेंद्रजी पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर तसेच शिवप्रेमी बांधव भगिनी उपस्थित होते.
******************************
छत्रपती शिवरायांनी स्पर्श केलेली स्पटिक माळ जळगाव मध्ये दर्शनासाठी
“स्वराज्याचे शिलेदार वीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितलताई शिवराज मालुसरे यांनी त्यांच्या कुटुंबात जतन करून ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या पवित्र कर कमलांनी स्पर्श केलेली स्पटीक माळ जळगाव येथे शिवजयंती महोत्सवात दर्शनासाठी आणलेली होती. या स्पटीक माळेचे दर्शन देखील कु.संजनाताई यांनी घेतले.”

































