संत मुक्ताई मंदिर | आमदारांनी केली वारकऱ्यांसाठी सु व्यवस्था | त्यातही एक कर्म करंटा घालत होता खोडा
कोण आहे तो कर्म करंटा ?
संत मुक्ताईनगर : तिर्थक्षेत्र संत मुक्ताई संस्थान येथे येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विजया एकादशी, महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सव असून मकर संक्रांती ला संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे नवीन मंदीर परिसरात शेकडो पायी दिंडी सोहळे मुक्कामासाठी येत असतात त्यामुळे येथे नवीन मंदिर परिसरात खडकाळ जमीन आहे. तेथे वारकऱ्यांना फडावर कथा कीर्तन श्रवण करण्यासाठी बैठक तसेच रात्री झोपण्यासाठी ओबडधोबड व खडकाळ जमीन असल्याने येथे मुरमिकरण करून सखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे तातडीने विकास काम मंजूर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या तसेच या कामाला अवधी असल्याने त्यातच यात्रोत्सव उंबरठ्यावर येवून ठेपल्याने आमदारांनी येथील मुरमीकरण कामाला तातडीने सुरुवात करून टाकली. येथील काम वारकरी व भाविकांच्या दृष्टीने चांगले होत असताना दुसरीकडे राजकीय पोटशूळ उठणार नाही असे होऊ शकत नाही. साधारणतः देव धर्माचं काम होत असताना कोणीही तसा आगाऊ पणा करत नाही परंतु येथील काही हलकट , नालायक लोकांनी याची परिसीमा गाठलेली आहे. असाच एक कर्म करंटा या कामातही खोडा घालण्याचा उद्देशाने महसूल विभागात जाऊन येथे सुरू असलेल्या मुरमिकरण मध्ये वापरली जाणारी मुरुमाची रॉयल्टी काढली की नाही याबद्दल या बड्या राजकीय व्यक्तीच्या नावाने धमक्या देवून माहिती घेवू लागला होता. परंतु आमदार पाटील यांनी आधीच सबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला रीतसर रॉयल्टी काढून येथे काम करण्याच्या सूचना केलेल्या असल्याने त्या कर्म करंट्या व्यक्तीला तोंडावर आपटावे लागले एव्हढे मात्र निश्चित.
“एक मात्र तो कर्म करंटा हा वाळू , मुरुम माफिया असून आई मुक्ताई अशा सडक्या वृत्तीच्या नीच माणसाला सदबुद्धी देवो देव धर्माच्या कामात आडकाठी आणणे हे नीच पणाचे लक्षण त्याच्यातून जाण्यासाठी त्याला सदबुद्धी देवो हीच मुक्ताई चरणी प्रार्थना !”