संत मुक्ताई पालखी सोहळा समिती तर्फे आयोजित बैठकीत जमा-खर्च विवरण जाहीर !
संत मुक्ताई ची मनोभावे सेवा केली म्हणून या सेवाधारी मंडळे व संस्थांचा झाला सत्कार !!
तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर : संत मुक्ताई पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र मुक्ताईनगर अशी आषाढी वारी करून स्वगृही मूळ समाधी स्थळ श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे या सोहळ्याचे आगमन झाले. या सोहळ्याचे स्वागत भव्य आणि दिव्य व्हावे म्हणुन
पालखी आगमन सोहळा समितीतर्फे सुंदर असे नियोजन केलेले असते. अनेक दानशूर दात्यांच्या सहकार्याने नेत्रदीपक सोहळा दि२३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. त्यामुळे या सोहळ्यासाठी दात्यांनी दिलेल्या रोख, वस्तू स्वरुपात तसेच गुप्त स्वरूपात मिळालेल्या देणगी चे जमा खर्च विवरण आयोजित बैठकीत करण्यात आले. तसेच तत्पूर्वी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
यानंतर संत मुक्ताई समाधी स्थळ मुळ मंदिर गाभाऱ्यात सेवेकरी म्हणून सेवा देणाऱ्या सेवकांनी केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील व पालखी आगमन सोहळा समितीतर्फे खालील संस्थांचा, मंडळाचा, संघटनांचा सत्कार पुष्पगुच्छ व आई मुक्ताई ची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यांचा झाला सत्कार –
1)समस्त गावकरी मंडळी, कोथळी
2)समस्त गावकरी मंडळी, सालबर्डी
3)श्री सत्य साई सेवा संघटना जळगाव समिती, वरणगाव
4)मुक्ताई भजनी मंडळ,उचंदा
5)कन्हैया महाराज देवस्थान ट्रस्ट,अंतुर्ली
6) मुक्ताई भजनी मंडळ, पूर्णाड
7) जय गजानन महिला मंडळ,देवधाबा
8)छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा मंडळ,तरोडा
9) अष्टभुजा दुर्गा मंडळ, इच्छापूर निमखेडी
10)मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी,मुक्ताईनगर