संत मुक्ताई पालखी सोहळा,स्वगृही परतीच्या मार्गावर
| जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता ||
श्री.संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता भेटीचा सोहळा संपन्न
युट्यूब व्हिडिओ लिंक Click Here
फेसबुक व्हिडिओ लिंक Click Here
गेल्या महिना भरापूर्वी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा आईसाहेब आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा पादुका पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरीस परमात्म्याच्या दर्शनाच्या ओढीने निघालेला होता. आषाढी वारी व नित्य उपचार आटोपल्यानंतर आज दि.२१ जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री. संत मुक्ताबाई यांच्या पादुकांचे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस भेटीचा सोहळा संपन्न झाला.
पंढरीहूनि गावा जाता । खंती वाटे पंढरीनाथा ।।
आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ।।
सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।
आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ।।
सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ।।
निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आता ।।
याप्रसंगी विठुरायाला निरोप देताना सर्व भावूक झालेले दिसून आले.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने ॲड. माधवी ताई निगडे, मुक्ताई संस्थान विश्वस्त सम्राट पंजाबराव पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे,ह.भ .प. विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर हरणे, उद्धव महाराज, प्रज्वल महाराज,पंकज महाराज आदी वारकरी मंडळी उपस्थित होते