संत मुक्ताई दरबारात, संजय महाराज पाचपोर यांचा दि.२८ सप्टेंबर रोजी होणार भव्य सत्कार !
महाराष्ट्र शासन, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 या पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित झालेले वारकरी भुषण हरिभक्त परायण गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांचा “भव्य सत्कार सोहळा” दि.२८ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता श्री.संत मुक्ताई समाधी स्थळ,श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) पार पडणार असून या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्री.संत मुक्ताई संस्थान, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जि.जळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून यासंदर्भात संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, संत मुक्ताई जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज माहिती दिली आहे.
तसेच संत मुक्ताई संस्थानच्या विश्वस्त व फडावरील किर्तनकार, कथाकार , टाळकरी, व फडकरी तसेच वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

।। काय आहे महाराजांचा परिचय ।।
• गांव : संजय आनंदा पाचपोर
• जन्म तारीख: १६ डिसेंबर १९६७
: मु. अडगांव (राहेर), पो. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला
• वास्तव्य : श्री गुप्तेश्वर आश्रम, शिर्ला (नेमाने), ता. खामगांव, जि. बुलढाणा पिनकोड – ४४४३०३
• अध्यक्ष : श्री संत ज्ञानोबा तुकाराम बहुउद्देशिय सेवा समिती, अकोला र.नं.ई.१०१९
: विश्वकल्याण वारकरी महासंघ आळंदी (देवाची), ता. खेड, जि. पुणे
• भ्रमणध्वनी क्र. ७०३०६०९८२५, ९८९०१९५९७५
आध्यात्मिक शिक्षण
• इ.स. १९८२ साली बालसंस्कार शिबीरातुन आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवातः • श्री संत गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था, शेगांव येथे ४ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण:
• ज्ञानेश योग आश्रम, डोंगरगण (सितेचे), ता. जि. अहमदनगर येथे गुरूवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या आश्रमामध्ये वेदांत, न्याय, व्याकरण शिक्षण:
• श्रीक्षेत्र आळंदी येथे शानेश्वरी ग्रंथाचे १०८ पारायण पुर्ण:
आध्यात्मिक कार्य
• किर्तन श्रीराम कयेच्या माध्यामातून आध्यात्मिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती, धर्म जागृती, व्यसनमुक्ती, जीवनमुल्यांचे प्रबोधन.
• बालसंस्कार शिवीर संपुर्ण महाराष्ट्रासह एकुण सहा राज्यांमध्ये उन्हाळी बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन. दरवर्षी या शिबीरांमध्ये जवळपास २५,००० विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होत आहेत, त्यासाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पुस्तके सर्व शिबीरांर्थीना मोफत देण्यात येतात व शिबीराकरीता सर्वोतोपरी मदत पुरवली जाते.
• हरिनाम सप्ताह संवर्धन महाराष्ट्रभर ज्या गावांमध्ये हरिनाम सप्ताह नाहीत तेथे वार्षिक हरिनाम सप्ताहांची सुरूवात करून ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांचे बिजारोपन करून समाजप्रबोधन.
• मंदिर जिणोंप्दार : गावोगावी जिर्ण झालेल्या मंदिरांची पाहणी करून त्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात येतो. आजरोजी जवळपास ४५० मंदिरांचा जिर्णोध्दार पूर्ण झालेला आहे.
• गोलंदा : देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण होण्यासाठी महाराष्ट्रातील ६२ गोशाळेचा स्विकार करून त्यांचे संवर्धन, संरक्षण व गोशाळा
• स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न. जवळ पास १७ हजार गाईंचे संगोपनाचे कार्य सुरू आहे. साप्ताहिक महाआरती विदर्भातील ४ जिल्ह्यांमध्ये ९५० गावांमध्ये सांधिकप्रार्थना व संघटन या हेतुने गावातील मंदिरामध्ये साप्ताहिक महाआरतीकरीता जवळपास १ लाख गावकरी एकत्रित येतात. या उपक्रमासाठी ३५०० गावांची निवड केलेली आहे.
• रामफेरी: गावकऱ्यांमध्ये भक्तीभाव उत्पन्नकरण्याकरीता महाराष्ट्रभर ५५० गावांमध्ये सकाळच्या वेळी दैनंदिन रामफेरीचे आयोजन.
• किर्तनकार संमेलन: धर्मजागृती, संघटन, वर्तमान व भविष्यातील धर्मापुढील आव्हाने व त्यावरील उपायोजना करीता कथा-
किर्तनाच्या माध्यमातुन आध्यात्मिक व सामाजिक जिवनमुल्यांची जोपसणा करणाऱ्या प्रबोधनकारांना ज्येष्ठांकडून मार्गदर्शन.
सामाजिक कार्य
• संचासंकल्प: सेवासंकल्पाच्या माध्यमातुन शेकडो बेवारस मनोरूग्णांचे उपचार व पालन पोषण व रुग्णवाहिका सेवा.
• समर्पण: या संस्थेद्वारे पिडीत महिला, बालक, युवा यांच्या करिता “सांझाग्राम” हे त्यांच्या हक्काचे स्थान निर्माण होत आहे.
• विद्यार्थी संगोपन : समाजातील अनाथ मुलांचे नित्यानंद सेवा प्रकल्प हिवरा व श्रीदत्त योगीराज बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या माध्यामातून संगोपन करून त्यांचे शिक्षण, पालनपोषण करून राष्ट्रभक्त व जबाबदार भावी पिढी निर्माण करणे.
• आपतग्रस्तांना मदत नैसर्गिक व इतर आपतग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करणे.
• पर्यावरण संवर्धन : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाकरीता वृक्षारोपन कार्यक्रम व किर्तनातून पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देणे.
• वरील सर्व उपक्रम महाराजांना मिळालेल्या कथा-किर्तनाच्या मानधनातून व समाजातील दानदात्यांच्या मदतीने उभे राहीले आहेत.