संत मुक्ताई, चांगदेव यात्रोत्सवासाठी जिल्हा दरबारी प्रथमच दखल !
आ.चंद्रकांत पाटलांच्या दमदार कारकिर्दीत संत भूमीतील माघवारी यात्रोत्सवांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार नियोजन
संत मुक्ताबाई माघ महावारी यात्रौत्सव नियोजन बैठक दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी यांचे दालनात आ.चंद्रकात पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व 11 विभागाचे प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील , रविंद्र महाराज हरणे सम्राट पाटील, उध्दव महाराज जुनारे , मेहुण सुधाकर महाराज यांनी हजर राहून वारकऱ्यांना अधिकाधिक सोयी सुविधा निर्माण करणेकामी चर्चेत सहभाग घेऊन काही प्रमुख मागण्या केल्या.
📢 संत मुक्ताबाई व चांगदेव महाराज यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न!
चांगदेव महाराज मंदीर,संत मुक्ताई मंदिर मेहुण, संत मुक्ताई मंदिर कोथळी (ता. मुक्ताईनगर) ,नवीन मुक्ताईनगर येथे महाशिवरात्री व विजया एकादशी पर्वावर भरणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या उस्फूर्त सहभागाने यात्रोत्सव भरत असतो या यात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
👤 बैठकीला उपस्थित मान्यवर:
✅ मुक्ताईनगरचे आमदार मा.श्री चंद्रकांत पाटील
‘याप्रसंगी मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, विश्वस्त सम्राट पाटील , संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई मंदिर ,श्रीक्षेत्र मुक्ताईनगर मंदिर व्यवस्थापक ह.भ.प उद्धव महाराज, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक सुधाकर महाराज, भुसावळ उपविभागीय अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार डॉ.निकेतन वाढे,पोलीस निरीक्षक श्री.नागेश मोहिते, गटविकास अधिकारी श्रीमती निशा जाधव , नगरपंचायत मुख्य अधिकारी श्री.गरकल , युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मौजे चांगदेव,चिंचोल,मेहून मंदिरातील व्यवस्थापक मंडळ तसेच सरपंच, ग्रामसेवक व शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
✅ मंदिर समितीचे सन्माननीय पदाधिकारी
✅ परिसरातील ग्रामस्थ व प्रशासनाचे अधिकारी
💡 महत्वाचे निर्णय व निर्देश:
🔹 यात्रेच्या काळात भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यावर भर.
🔹 कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश.
🔹 स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहण्यासाठी विशेष उपाययोजना.
🔹 यात्रेच्या नियोजनासाठी निधी ची तरतूद करण्यात येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
🔹 मुक्ताईनगर नगरपंचायतीस नफा फंडातून तातडीने १० पिण्याच्या पाण्याचे टँकर घेण्याच्या बैठकीत सूचना.
🚀 चांगदेव महाराज यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन कटिबद्ध! 🙌✨