Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 

यासह श्री. निवृत्तीनाथ दादा , त्र्यंबकेश्वर, श्री.नामदेवराय पंढरपूर, श्री. रुक्मिणी माता , कौडीण्यपुर हे पालखी सोहळ्याचा देखील होणार मुक्ताईनगर कडे प्रस्थान

Admin by Admin
May 11, 2023
in मुक्ताई वार्ता
0
संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान
यासह श्री. निवृत्तीनाथ दादा , त्र्यंबकेश्वर, श्री.नामदेवराय पंढरपूर, श्री. रुक्मिणी माता , कौडीण्यपुर हे पालखी सोहळ्याचा देखील होणार मुक्ताईनगर कडे प्रस्थान
पंढरपूर / मुक्ताईनगर /प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे शुक्रवार दि. १२ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होत असल्याची माहिती श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर हा परंपरेने सुरु असलेला पालखी सोहळा श्री संत मुक्ताबाई यांच्या ७२६ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी शुक्रवार दि. १२ मे रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवीत आहे. श्री पांडुरंगराय पादुकांची सकाळी ६ वाजता विधीवत पुजा झाल्यानंतर मंदिरे समितीच्या वतीने मानकऱ्यांचा सन्मान होईल व हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान ठेवेल.
शुक्रवार दि. १२ रोजी सकाळी ९ वाजता करमाळा, दुपारी १ वाजता अहमदनगर, सायंकाळी ४ वाजता नेवासा फाटा मार्गे सायकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील श्री गजानन महाराज मंदिरात मक्कामी पोहोचेल. शनिवार दि. १३ रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर येथे संत नामदेव महाराज पादुका भेट सोहळा, नैवेद्य व भोजन घेवून सायंकाळी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पाणाचे मार्गे सायंकाळी ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पोहोचेल. येथे संत निवृत्तीनाथ व श्री पांडुरंगराय पादुका भेटीचा सोहळा होईल तर पंढरपूरहून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर येथे मुक्कामी पोहोचतील.
रविवार दि १४ मे रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा असून या सोहळ्यासाठी श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास ॐ नामदास यांची होईल तर रात्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांची कीर्तनाची सेवा होईल.
सोमवार दि. १५ मे रोजी एकादशी निमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणुक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल. मंगळवार दि. १६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल. मलकापूर, मोताळा, बुलढाणा मार्गे हा सोहळा श्रीक्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. बुधवार दि. १७ मे रोजी देऊळगांवराजा, जालना, अंबड, गेवराई मार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. गुरुवार दि. १८ मे रोजी कुंदलगिरी फाटा, वाशी, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुर्डुवाडी मार्गे सायंकाळी ६ वाजता हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे यांनी दिली.
मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान सोहळा यशस्वीेतेसाठीसंस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील,  पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी व्यवस्थापक उद्धव जूनारे महाराज तसेच संस्थान चे विश्वस्त व फळावरील किर्तनकार , फडकरी ,टाळकरी मंडळी परिश्रम घेत आहे.
Tags: Astrology NewsJalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar News
Previous Post

*महाराष्ट्र सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टचा अंतरीम निकाल/महत्वाचे मुद्दे:*

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली,उष्माघात प्रतिबंधात्मक उपायोजना आढावा बैठक !

Admin

Admin

Next Post
संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यासाठी उद्या 12 मे शुक्रवार रोजी होणार  श्री.पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे पंढरपूर हुन मुक्ताईनगर कडे प्रस्थान 

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली,उष्माघात प्रतिबंधात्मक उपायोजना आढावा बैठक !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group