संत मुक्ताईनगर येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन !
आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व समाज बांधवांची उपस्थिती
संत मुक्ताईनगर : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संत मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात बाळासाहेबांची शिवसेना परिवार तर्फे मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे , नगरसेवक संतोष मराठे, प्रकाश काळबैले, बाबुराव पाटील, जाफर अली,प्रमोद सोनवणे, संचालाल वाघ, शकुर जमदार, कैलास डहाके, निमखेडी खू., सरपंच गणेश धुंदे, गोपाळ सोनवणे, रमेश(साधू) पाटील, राजू कापसे, अतुल जावरे, सुभाष बनिये, शिवराज पाटील,संतोष माळी, पप्पू मराठे, हरी शिर्के, देवेंद्र काटे आदींसह असंख्य पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.सर्व उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.