संत मुक्ताईच्या दरबारातील भव्य बाल सुसंस्कार शिबिराची काल्याचे किर्तन व पुरस्कार वितरणाने सांगता !
शिबीराचे आयोजक युवा किर्तनकार स्वप्निल महाराज आळंदीकर झाले समारोप प्रसंगी भाऊक !!
मुक्ताईनगर : जुनी कोथळी ता.मुक्ताईनगर येथे आदिशक्ति मुक्ताई मंदीरासमोरील परिसरात “श्रीमंत संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था,आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे तर्फे आयोजित भव्य वारकरी बाल सु-संस्कार शिबीर सांगता प्रसंगी ह भ प कन्हैया महाराज (खळकोद, मध्यप्रदेश) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाल्यानंतर शिबिरात उत्कृष्ट गायन, मृदंग वादन, संत चरित्र, गीता, हरिपाठ पाठांतर यात यशस्वी चुणूक दाखविणाऱ्या गुण संपन्न बालकांना पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.सोहळ्यासाठी सहभागी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनीताई पाटील व कन्या कु.संजनाताई पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद हरणे महाराज यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा प्रचार प्रमुख दिनेश कदम, ह भ प माऊली महाराज (कर्की) ह भ प किरण महाराज, कार्यक्रमाचे आयोजक युवा किर्तनकार स्वप्निल महाराज (आळंदीकर), युवा सेना जिल्हा प्रमुख तथा कोथळी उपसरपंच पंकज राणे, नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे, ह भ प चेतन महाराज , ह भ प किर्तनकार दुर्गा संतोष मराठे, ह भ प भारुड सम्राट मंगेश महाराज भिल्ल, मनोज कोळी, भूषण मराठे, महेंद्र मोंढाळे, शंकर बोरखेडे , पंकज कोळी, शुभम तळेले आदींची उपस्थिती होती.

१५ दिवसांच्या शिबिर काळात यांनी केले यश संपादन :
गायन प्रथम क्रमांक:
अमोल दिलीप जुम्बळे.
गायन द्वितीय क्रमांक:
साई रामदास तायडे
मृदंग प्रथम क्रमांक:
घनश्याम श्रीहरी जुम्बळे
मृदंग द्वितीय क्रमाक:
वेदांत हरिदास म्हैसागर
पाठांतर. – गीता, हरिपाठ, श्लोक :
प्रथम क्रमांक
सुमित लक्ष्मीमन चव्हाण
द्वितीय क्रमाक
ऋषिकेश गणेश तायडे
आदर्श शिक्षक गायक :
कृष्णा महाराज आळंदी (कर्कीकर )
मंगेश महाराज भिल आळंदी ( चिखलीकर )
भूषण महाराज आळंदी ( पिंप्री आकराऊत )
पवन महाराज आळंदी
मयूर महाराज आळंदी
ओम महाराज आळंदी

कार्यक्रमासाठी मनोहर हरी तायडे (वारकरी सेवक ) यांचं संपूर्ण कुटुंब, अजय श्रीराम आढाव(वारकरी सेवक) यांचे विशेष सहकार्य लाभले.