संतभुमी मुक्ताईनगरी उद्या शुक्रवारी दि.१६ रोजी “यळकोट यळकोट जय मल्हार” च्या घोषणांचा आवाज घुमणार !
धनगर समाजाची भव्य निर्धार मेळाव्याची जय्यत तयारी सुरू !
मुक्ताईनगर – धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने मुक्ताईनगर येथे धनगर समाजाच्या वतीने शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यात समाजातील सर्व अडी अडचणी व प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी धनगर समाजातर्फे वज्र मूठ बांधण्यात येणार आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील धनगर समाजाने अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत आवाज उठवून सरकार दरबारी न्याय मिळण्यासाठी जय मल्हार सेनेच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या १६ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरातील धनगर व मेंढपाळ समाजाचा भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटना आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर मेळाव्याच्याअध्यक्षस्थानी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे हे राहणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार सेना तालुकाप्रमुख रविंद्र पाचपोळे, बाळू शिंदे, संदीप जुमळे, राजेश जुमळे, सिताराम बिचुकले, संतोष भारसाकळे, शंतकर केसकर, पुंडलीक सरक, भारत मदने, किसन खोंदले, हिरामण येळे, राजेन्द् हिवराळे यांनी केले आहे.