संगीतमय शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य स्वरुपात 22 फेब्रु. पासून मुक्ताईनगरीत आयोजन !
संत मुक्ताईनगर : शहरातील जुनेगावातील नागेश्वर मंदिरासमोर भव्य दिव्य स्वरूपात कथा मंडप व आसन व्यवस्थेची सुसज्ज तयारी पूर्ण झाली असून येथे संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत दररोज दुपारी 12 ते 4 या काळात कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.मंगेश महाराज वराडे यांचे होणार कथा प्रवचन
दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा नगरपंचायत कार्यालय मागील हनुमान मंदिरापासून निघणार असून प्रवर्तन चौक मार्गे जूनेगाव नागेश्वर मंदिर कथा स्थानावर येणार आहे. संगीतमय शिव महापुराण कथा मंगेश महाराज वराडे यांच्या अमृत तुल्य वाणीतून सांगितली जाणार आहे.
श्री नागेश्वर मंदीर परीसरात होणार प्रवचन
श्री नागेश्वर मंदिर (शिवालय) हे खूप पुरातन मंदिर असून दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत चालणाऱ्या या कथेत दररोज कथेतील प्रसंगानुसार सजीव झाकीया दाखवल्या जाणार असून दिनांक 1 मार्च रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच बुऱ्हाणपूर येथील कथेचे टशन पाहता तसेच सद्या शिव पुराण कथा श्रवण करण्याचे पुण्य व महात्म्य पाहता कथेसाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांना बसता यावे असे भव्य सभामंडप उभारण्यात आले आहे.
कथा काळात दररोज रात्री ८ ते १० वाजेपर्यंत सुश्राव्य किर्तने होणार
दि.22 ह.भ.प.सौ.इंद्रायणीताई अमोल बगाडे (उमाळी ता.मलकापूर)
दि.23 ह.भ.प.श्री.रामेश्वर महाराज तिजारे(संत सखाराम महाराज वंशज)
दि.24 ह.भ.प.श्री.मधुकर महाराज (शिरसोली कर)
दि.25 ह.भ.प.श्री. रवींद्र हरणे महाराज(संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख)
दि.26 ह.भ.प.श्री.दिलीप महाराज (गिरणी बेलाड ता.नांदुरा)
दि.27 ह.भ.प.श्री.जीवन महाराज सर(नाडगाव ता. बोदवड)
दि.28 ह.भ.प.सौ. दुर्गाताई महाराज संतोष मराठे (तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर)
दि.1 मार्च ह.भ.प.श्री.मंगेश महाराज वराडे यांचे काल्याचे कीर्तन (वेळ स. १० ते १२वाजेपर्यंत)
नागेश्वर भक्तांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
शोभायात्रा, संगीतमय शिव महापुराण कथा व महाप्रसादास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवपुराण कथा समिती , नागेश्वर मंदिर मुक्ताईनगर यांनी केले आहे.