Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

श्री संत मुक्ताबाई ७२७ वा अंतर्धान समाधी सोहळा २ जून रोजी

सोहळ्यानिमित्त भव्य ११ दिवसीय  महोत्सवाचे आयोजन ! 

Admin by Admin
May 22, 2024
in मुक्ताई वार्ता
0
श्री संत मुक्ताबाई ७२७ वा अंतर्धान समाधी सोहळा २ जून रोजी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री संत मुक्ताबाई ७२७ वा अंतर्धान समाधी सोहळा २ जून रोजी

सोहळ्यानिमित्त भव्य ११ दिवसीय  महोत्सवाचे आयोजन !
आरंभ :- वैशाख कृ.२ शनिवार ता.२५/०५/२०२४ रोजी
तर सांगता :- वैशाख कृ १३ मंगळवार दि.४ जून २०२४ रोजी होईल.
आदिशक्ती मुक्ताई ७२७ वर्षापुर्वी विजेचा प्रचंड कडकडाटात अंतर्धान झाल्या स्व-स्वरुपात लिन झाल्या त्यांनी तिरोभुत समाधी घेतली त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा राई रुखमाई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ व समकालीन सर्व संत हजर होते. त्याच पवित्र स्थळी वैशाख कृ. १० दि.२ जुन २०२४ रोजी मुख्य अंतर्धान सोहळा साजरा करण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथुन श्री संत नामदेव महाराज, श्री भगवान पांडुरंगाचा पादुका पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथुन श्री संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी सोहळा, सासवड येथुन संत सोपानकाका पादुका सोहळा, कौंडण्यपूर येथुन माता रुख्मीणी पादुका सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान देहू प्रतिनिधी व संत महंतांच्या उपस्थीतीने श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने वै. पंढरीनाथ महाराज मानकर यांच्या प्रेरणेने वै. प्रल्हाद महाराज सुळेकर यांनी घालून दिलेल्या परंपरेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम ११ दिवसीय महोत्सवाचे आयोजन श्री संत मुक्ताबाई संस्थान चे वतीने करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी उपस्थीत राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळ मुळमंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर जि. जळगांव चे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील व विश्वस्त मंडळ आणि संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रविंद्र हरणे महाराज,ह.भ.प. उध्दव महाराज जुनारे (व्यवस्थापक) संत मुक्ताई फडावरील किर्तनकार वारकरी मंडळी यांनी केले आहे.
अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा
दि.१/०६/२०२४ वार शनिवार
संध्या. ५ वा :
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पादुका दिंडीचे आगमन
दि.०२/०६/२०२४ वैशाख कृष्ण १० शके १९४६ रविवार रोजी
सकाळी ५ वा :- संत मुक्ताई महापुजा
सकाळी ८ वा :- श्री विठ्ठल व माता रुख्मिणी, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपानकाका पादुका पालखी सोहळा आगमन
सकाळी १०:३० :- श्री संत नामदेव महाराज विद्यमान १६ वे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास महाराज पंढरपुरकर यांचे समाधी सोहळा पुष्पवृष्टी, गुलालाचे किर्तन व आरती
दि.०३/०६/२०२४ सोमवार वैशाख कृ. एकादशी
सकाळी ७ वा :- मुक्ताई मुळमंदिर ते नविन मंदिर भव्य श्रीपांडुरंगाचा पालखी सोहळा मिरवणुक होईल तरी भजनी मंडळी वारकरी दिंड्या आणुन सोहळ्यात सहभागी व्हावे
दैनिक कार्यक्रम
सकाळी ४ ते ६ काकड आरती, ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम व मुक्ताईपाठ
७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ३ गाथा भजन,
३ ते ५ प्रवचन, ५ ते ७ हरिपाठ आरती, रात्री ८:०० ते १०:०० किर्तन
* व्यासपिठ नेतृत्व *
ह.भ.प. संदिप महाराज (खामनीकर)
प्रवचनकार
ह.भ.प. नरहरी महाराज गाजरे (मुक्ताईनगर)
ह.भ.प.लखन महाराज पाटील (मुक्ताईनगर)
ह.भ.प. रामशंकर महाराज जवरे (मुक्ताईनगर)
ह.भ.प. अंबादास महाराज जुनारे (तांदुलवाडी सिध्देश्वर)
ह.भ.प. महादेव महाराज खोडके (श्रीदत्तमंदिर संस्थान, भाडगणी)
ह.भ.प. अमोल महाराज पाटील (मुक्ताईनगर)
ह.भ.प. विजय महाराज खवले (मुक्ताईनगर)
ह.भ.प. पंकज महाराज पाटील (मुक्ताईनगर)
किर्तनकार
ह.भ.प. दिपक महाराज पाटील (निंभोरा सीम)
ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे (श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर)
ह.भ.प. धनराज महाराज अंजाळेकर (गादीपती, सद्‌गुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर दिंडी परंपरा)
ह.भ.प. विश्वंभर महाराज तिजारे (गादीपती, सद्‌गुरु सखाराम महाराज सखारामपुर दिंडी परंपरा)
ह.भ.प. भरत महाराज पाटील (गादीसेवक, सद्गुरु इंड्रीमहाकरहिंडी परंपरा)
ह.भ.प. परमेश्वर महाराज, (गोंदखेडकर सद्‌गुरु चार्तुमास्ये महाराज अन्नपूरक परंपरा)
ह.भ.प. सारंगधर महाराज गोळेगावकर (गादीपती, सद्‌गुरु पंढरीनाथ महाराज मानकर फड़ परंपरा)
ह.भ.प. रमेश महाराज, आडविहीर (गादीपती, सद्‌गुरु मुकुंद महाताज एणगावकर हिंडी) परंपरा
दि.२ जून २०२४ रोजी
स.१०:३० ते १२:३० श्री.संत मुक्ताबाई तिरोभुत समाधी सोहळा किर्तन व पुष्पवृष्टी
ह.भ.प. केशवदास नामदास महाराज (पंढरपूर,संत नामदेव महाराज वंशज)
दू. ४ ते ५ प्रवचन ह.भ.प. बाबुराव महाराज वाघ, (पंढरपूर)
रात्री ८ ते १० ह.भ.प. जयंत महाराज गोसावी (पुजारी श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर)
०३/०६/२०२४ सोमवार रोजी
वैशाख कृ. भागवत एकादशी
रात्री ८ ते १० ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली
अध्यापक व विश्वस्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी
०४/०६/२०२४ मंगळवार रोजी
वैशाख कृ. १३
काल्याचे किर्तन सकाळी ७ ते ९
ह.भ.प. केशवदास नामदास महाराज पंढरपुर
(संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज)
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar NewsNewsSant muktabaiSant muktabai abhangSant muktabai bhashanSant muktabai newsमुक्ताई वार्तासंत मुक्ताई
Previous Post

मुक्ताईनगर विधानसभेत शिवसेनेच्या कार्यकारणीत यांची झाली नियुक्ती

Next Post

कपाशी बियाण्यांची लिंकिंग जादा दराने विक्री आ.चंद्रकांत पाटलांचा इशारा

Admin

Admin

Next Post
कपाशी बियाण्यांची लिंकिंग जादा दराने विक्री आ.चंद्रकांत पाटलांचा इशारा

कपाशी बियाण्यांची लिंकिंग जादा दराने विक्री आ.चंद्रकांत पाटलांचा इशारा

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group