श्री कॉलनीतील फ्रेंड्स गणेश मित्र मंडळात,
ह.भ.प.सौ.दुर्गाताई संतोष मराठे यांनी सुश्राव्य किर्तनातून संस्कृती जतन, समाज प्रबोधन व नाम चिंतनाचा दिला संदेश
मुक्ताईनगर : एरव्ही गणेश मंडळ म्हटले की डी जे, मोठ मोठ्या आवाजातील चित्रपटाचे गीत असाच काहीसा प्रकार दिसून येतो परंतु मुक्ताईनगर येथील श्री कॉलनीतील फ्रेंड्स गणेश मित्र मंडळातर्फे विविध सांस्कृतिक, समाज प्रबोधन कार्यक्रम , दांडिया स्पर्धा आदींचे आयोजन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यासह त्यांनी किर्तनकार सौ. दुर्गाताई संतोष मराठे यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केला . हा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात येथे पार पडला. यावेळी मंडळातर्फे किर्तनकार दुर्गाताई मराठे यांना सर्वोत्कृष्ट किर्तनकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार राञंदिवस ।।१।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा ।। ह्रदयी कळवळा वैष्णवांचा ।।२।।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।। साधन निर्धारी आण नाही ।।३।।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम ।। तो देवा परम पुज्य जगी ।।४।
या अभंगावर त्यांनी सुश्राव्य कीर्तन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी वाक पुष्पातून निरूपण देताना श्री गणपती जन्म कथा, दुर्वा महात्म्य,गणपती चातुर्य , नाम चिंतन आदींवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच तिर्थक्षेत्र मुक्ताई च्या भूमीतील असल्याने सर्वांनी मुक्ताई ची वारी व नित्य दर्शन घेण्याचे आवाहन करीत गणपती उत्सवात समाज प्रबोधन , विविध स्पर्धात्मक कार्यक्रम घेवून श्री गणरायला आवडतील असेच कार्यक्रम उपक्रम मंडळांनी राबवावे असे आवाहन केले. यासह त्यांनी महिलांना संस्कृती विषयी मार्गदर्शन करून महिलांनी संस्कृती जपून जिजाऊ सारखे संस्कार मुलांना देवून भावी आदर्श पिढी सुंस्कृत घडवा असे आवाहन केले.
यावेळी निलेश शिरसाठ, नितीन घोरपडे,रवि दांडगे, प्रकाश सोनार,विनोद सुरवाडे,विनायक पाटील, शिवाजी पाटील,सुनील श्रीखंडे, सुमित झांबरे, सचीन पाटील, सुरज राणे, शुभम पाटील,किरण पाटील, कुणाल श्रीखंडे, गीतेश काळे, जयेश पाटील, तेजस झांबरे,रोहित राजपूत,मोहित मोरे, सत्यजित कोळी, हर्षल खेडकर, श्रीकृष्ण वाघ आदींची उपस्थिती होती.
नगरसेवक निलेश शिरसाठ यांचे कडून पारितोषिक ट्रॉफी
मंडळातर्फे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम , दांडीया स्पर्धा यात यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांनान गरसेवक निलेश शिरसाठ यांचे कडून पारितोषिक ट्रॉफी देण्यात येणार आहे.