शेतकऱ्यांसाठी Breaking News
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश,
पोट- खराब शेत जमीन लागवडी योग्य करण्यास महसूल प्रशासनाचे तारखे प्रमाणे कॅम्प जाहीर !
मुक्ताईनगर : गाव नमुना नं. 7/12 मधील वर्ग अ पोटखराब क्षेत्र बहुतांश शेतक-यांनी सुधारणा करुन लागवडीखाली आणलेली आहे ही शेतजमीन उताऱ्यावर लागवडी योग्य नोंद होण्यासाठी शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केली होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील महसूल विभाग खडबडून जागे झाले आणि यासंदर्भात जलद गतीने कामकाज सुरू झाले त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशाने जिल्ह्यासह मुक्ताईनगर तहसीलदारांनी मुक्ताईनगर तालुक्यातील महसुली मंडळे व सजे या ठिकाणी तारखे नुसार तक्ता जाहीर कॅम्प लावून अंबल बजावणी करण्याचे तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे. सदरील प्रशासनाच्या गतीला आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न फलदायी झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
____________________________________
गाव नमुना नं. 7/12 मधील वर्ग अ पोटखराब क्षेत्र बहुतांश शेतक-यांनी सुधारणा करुन लागवडीखाली आणलेली आहे. याबाबत शासनाने दिनांक 29/08/2018 च्या अधिसूचनेद्वारे नियमामध्ये बदल करून पोट खराब क्षेत्र लागवडीलायक मध्ये रुपांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. सदर अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 च नियम 2 चा पोट-नियम (2) मध्ये “वर्ग (अ) खाली येणारी जमीन, धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल, आणि अशा प्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास, त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात, पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे, त्याकरिता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील.” अशी सुधारणा शासन निर्णयात केली आहे.
खालील तारखेनुसार कॅम्प लावून अंबल बजावणी होणार :
दि.१५ सप्टेंबर २०२२ : – कोथळी, चांगदेव, चिंचोल, निमखेडी खुर्द ,हरताळे ,पातोंडी ,बेलसवाडी, पूर्णाड, उचंदे , कर्की, पिंप्राळा, कोठा, काकोडा, चिचखेडा खुर्द, मन्यारखेडे ,सुकळी, चारठाणा.
दि.२२ सप्टेंबर २०२२:- सालबर्डी, चांगदेव, मेहून, ढोरमाळ, हरताळे, नरवेल , पिप्री नांदू ,धाबे व मेंढोदे, खामखेडे,नायगाव,कुऱ्हा, भोटा, काकोडा ,चिचखेडे खुर्द, सातोड, भांडगुरे, दुई, मोरझीरा
दि.२९ सप्टेंबर २०२२ :- मुक्ताईनगर ,मानेगाव ,वढवे, सारोळा, हरताळे, अंतूर्लि, धामणदे, शेमळदे, पंचाणे, रामगड व कोठे, थेरोळा, रिगाव, बोरखेडा ,धुळे, कुंड तरोडा, डोलारखेडा,मधापुरी.
*दि.६ ऑक्टोंबर २०२२ :-* मुक्ताईनगर, मानेगाव, कासारखेडा, माळेगाव, हरताळे, अंतुर्ली, बेलखेडे, पिंप्री पंचम, मेळसांगवे, लोहारखेडा,पारंबी, कोऱ्हाळा, राजुरे, धुळे , घोडसगाव, चिखली, नांदवेल, धामणगाव.
*दि.१३ऑक्टोंबर २०२२ :-* मुक्ताईनगर अंतुर्ली भोकरी मोंढोळदे, पिप्री भोजना, उमरे, वडोदा, निमखेडी बुद्रुक, घोडसगाव, रुईखेडे, चिचखेडा बुद्रुक.
*दि.२० ऑक्टोंबर २०२२ :-* हिवरे, हलखेडा, निमखेडी बुद्रुक, घोडासगाव , वायला.
*दि.२७ ऑक्टोंबर २०२२ :-* तालखेडा, हलखेडा, बोदवड, टाकळी.
*दि.०३ नोव्हेंबर २०२२ :-* जोंधनखेडा, इच्छापुर, महालखेडा . अशा स्वरूपात तारीख नुसार कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.
_______________________________________
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील शेतक-यांनी त्यांच्या शेतजमिनीमधील पोटखराब क्षेत्र मोठ्या कष्टाने लागवडीखाली आणली आहे. शासनाने पोट खराब वर्ग ‘अ’ च्या सर्व जमिनी लागवडयोग्य ठरविल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतक-यांच्या गांव नमुना नं. 7/12 वर असलेली जमीन गांव नमुना नं. 8 अ च्या उता-यावर येणार आहे. त्यामुळे पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत पिकांचे होणा-या नुकसानीचा मोबदला, भूसंपादन मोबदला, खरेदी-विक्रीतील मोबदला इ. तसेच शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा शेतक-यांना लाभ घेता येणार आहे. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी स्वत:हून तहसीलदार वा संबंधीत तलाठी/मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्याच शेतकऱ्यांच्या 7/12 उता-यावरील पोटखराब क्षेत्र कमी करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे वा सुरु आहे. मात्र सदर शासन सुधारणेचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे.