शेगाव नगरीत आदिशक्ति मुक्ताईच्या नाम गजरात भाविक दाखल
ह.भ.प.सौ.दुर्गाताई मराठे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच “जय हनुमान भजनी मंडळ,शिवरायनगर (प्र.क्र.१२), मुक्ताईनगर”पायी दिंडी सोहळा श्रींच्या दर्शनासाठी शेगावी
मुक्ताईनगर : संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हरतालिका व ऋषी पंचमी च्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक व पायी दिंडी सोहळे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. संत संस्थान तर्फे देखील सदरील भाविक व पायी दिंडी सोहळ्याचा यथोचित सत्कार करून आदरातिथ्य करण्यात येते. हा अलौकिक सोहळा संत मुक्ताई च्या तीर्थक्षेत्रातील भाविकांना देखील अनुभवता यावा म्हणून किर्तनकार ह भ प सौ दुर्गाताई संतोष मराठे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच आज दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी जय हनुमान भजनी मंडळ,शिवरायनगर (प्र.क्र.१२), मुक्ताईनगर येथील रहिवाशांचा “तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर ते शेगाव” पायी दिंडी सोहळा श्रींच्या दर्शनासाठी शेगावी आदिशक्ती मुक्ताई, ज्ञानोबा माऊली च्या नाम घोशाने व टाळ मृदुंगाच्या गजराने भक्तिमय वातावरणात दाखल झाला. यावेळी आदिशक्ती मुक्ताई साहेबांच्या भूमीतून आलेल्या पालखी सोहळ्याचे शेगाव संस्थान तर्फे सहर्ष स्वागत करून पालखी सोहळ्याला मृदंग, विना, टाळ तसेच श्रींचे तीन ग्रंथ भेट देवून गौरविण्यात आले.

दिंडी सोहळयात सुरेश भोलाने, दिलीप पाटील, रमेश पाटील, रतन बडगुजर, शांताराम लिहेकर, संतोष मिस्तरी,शिवाजी मराठे, ज्ञानेश्वर माळी, गोपाळ चौधरी, गायनाचार्य रतिराम महाराज(खामखेडा) ,अनिल मराठे (पिंप्रीआकराऊत), मृदंगाचार्य विनोद पाटील (सातोड), किर्तनकार दुर्गा संतोष मराठे, सविताबाई लिहेकर, विमलबाई सोनार, प्रभाबाई पाटील, दुर्गाबाई बाविस्कर, संगीताबाई मराठे, इंदूबाई भोलाने, छायाबाई चौधरी, निर्मलाबाई चौधरी, लतिकाबाई पाटील, कुसुमबाई बाविस्कर, स्वातीबाई बाविस्कर, विमलबाई सनांसे, पार्वताबाई कांडेलकर, पवन विनोद पाटील, कृष्णा संतोष मराठे, सेजल बाविस्कर, नैना कांडेलकर आदींनी सहभाग घेतला होता.