शेअर बाजार गुंतवणूकीवर बोलू काही : तज्ज्ञांचे मुक्ताईनगर येथे २४ जुलै रोजी मार्गदर्शन शिबीर !
पत्रकार संघ व मुक्ताईनगर सिव्हील सोसायटी तर्फे आयोजित
एम सी एक्स, एल के पी सेक्युरिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने ,मुक्ताईनगर पत्रकार संघ, सिव्हिल सोसायटीज , हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर व गुरू राष्ट्रीयआर्थिक साक्षरता मंच यांच्या तर्फे आयोजित ,कमोडिटी मार्केट म्हणजे काय, सोने ,चांदी डिमॅट मध्ये घेऊ शकतात का? व शेअर बाजार गुंतवणूकीवर बोलू काही , मंदी हीच संधी असते का? शेअर बाजारात नफा मिळतो का?भीती व लाभ यावर कसे नियंत्रण मिळवावे या व अशा विविध विषयासंबंधी चर्चा सत्राचे आयोजन
२४ जुलै २०२२ ला संध्याकाळी ५ वाजता जैस्वाल लॉन्स मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे .
ह्या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार चंद्रकांत जी पाटील यांच्या हस्ते होईल तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे व डॉ तेजांशु श्री सरोदे , प्रत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शरद बोदडे, उपाध्यक्ष श्री विनायक वाडेकर, सचिव , संदीप जोगी व सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत , ह्या कार्यक्रमाला अर्थतज्ञ व मुक्ताईनगरचे भूमिपुत्र एल के पी चे व्हॉइस प्रेसिडेंट विश्वनाथ बोदडे व एम सी एक्स चे बुसिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर नितीन अहिरवार मार्गदर्शन करणार आहेत , कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.