शिवसेना ५७ व्या वर्धापन दिनी, मुक्ताईनगरात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार !
मुक्ताईनगर : हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांनी भारित होऊन मुक्ताईनगर येथे शिवसेनेचा भगवा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अंगा खांद्यावर घेऊन प्रचंड संघर्ष करीत पक्ष संघटना व शिवसेनेचे विचार यांच्याशी एकनिष्ठ राहून कायम हृदयात शिवसेना जोपासली अशा ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिवसैनिकांच्या घरी तसेच व्यवसाय ठिकाणी जाऊन शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
या ज्येष्ठ शिवसैनिकांचा केला सत्कार :
माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख, कैलास दैवे, गोपाळ सावळे, सुभाष डवले, रमेश पालवे, कलीम मणियार,महेबूब मिस्त्री, अनमोल ठेकेदार, हकीम मिस्त्री, संभाजी मराठे, बाळू श्रीखंडे ,ब्रिजलाल मराठे, अर्जुन भोई, दिलीप मनसुटे, प्रकाश मनसुटे, चंद्रकांत मराठे , मधुकर भोई आदींचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी यांची होती उपस्थिती :
छोटू भोई, अफसर खान, महेंद्र मोंढाळे, नगरसेवक निलेश शिरसाट,प्रफुल्ल पाटील, गणेश टोंगे, राजू तळेले, संतोष माळी, पप्पू मराठे ,साबीर पटेल, विजय सावळे, गोपाल पाटील , सुनील गवते, स्वप्नील श्रीखंडे आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.