शिवसेनेचे रावेर लोकसभा पक्ष निरीक्षक विजय देशमुख यांचा २ व ३ मे रोजी लोकसभा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक यांचा दोन दिवसीय दौरा आयोजित केलेला आहे. लोकसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा या दोन दिवसीय दौऱ्यात होणार आहे.
यानुसार दि २ रोजी सकाळी १० वाजता मुक्ताईनगर विधानसभा मुक्ताईनगर येथे , सायंकाळी ५ वाजता जामनेर विधानसभा जामनेर येथे , दि ३ मे रोजी सकाळी १० वाजता रावेर विधानसभा रावेर येथे , दुपारी १ वाजता मलकापूर विधानसभा दसरखेड तालुका मलकापूर येथे सायंकाळी ५ वाजता भुसावळ विधानसभा भुसावळ , येथे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व शाखाप्रमुख सर्व बुथप्रमुख सर्व शिवदूत यांच्याशी संघटन वाढ विविध सलग्न संघटना जसे युवासेना , महिला आघाडी इतर यांची पदाधिकारी निवड तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करणे व त्यांचा सत्कार तसेच नवीन पदाधिकारी निवड यावर सविस्तर चर्चा होणार असून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे यावेळी पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हा संघटक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ .नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज राणे व पवन भोळे यांच्यासह सर्व मुख्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, शिवदूत, शाखाप्रमुख, वैद्यकीय आघाडी, युवासेना, महिला आघाडी च्या सर्व शिवसैनिकांनी आपापल्या विधानसभेच्या ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.