शिवसेना रावेर लोकसभेची दुसरी कार्यकारणी जाहीर, वाचा, कोणा कोणाची लागली वर्णी !
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शिवसेनेत गेल्या दोन महिन्यात इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यवर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर केली.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख; सौ नंदा प्रकाश निकम (कार्यक्षेत्र :- भुसावळ बोदवड यावल तालुके)
रावेर उपतिल्हा प्रमुख :- श्री.योगेश दिगंबर पाटील (कार्यक्षेत्र रावेर विधानसभा)
तालुका प्रमुख बोदवड :- प्रमोद धामोडे :- (कार्यक्षेत्र बोदवड तालुका)
सोशल मिडिया प्रमुख :- श्री. शिवराज पाटील (कार्यक्षेत्र रावेर लोकसभा)
सोशल मिडिया प्रमुख :- श्री.सुशील तायडे (कार्यक्षेत्र मुक्ताईनगर)
भुसावळ तालुका समन्वयक श्री. सुरेश चौधरी मो. (कार्यक्षेत्र भुसावळ तालुका)
भुसावळ विधानसभा समन्वयक श्री. नयन सुरवाडे (भुसावळ विधानसभा)
भुसावळ तालुका संघटक श्री. प्रशांत पाटील (कार्यक्षेत्र भुसावळ तालुका)
यावल तालुका संघटक : श्री. भूषण रविन्द्र पाटील (कार्यक्षेत्र यावल तालुका)
जामनेर तालुका संघटक : श्री. प्रविन वसंत ठाकरे. (कार्यक्षेत्र जामनेर तालुका)
वरील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी अभिनंदन केले आहे.यासंदर्भातील वृत्त प्रसिद्धी पत्रकांन्वये जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी कळविली आहे.