Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

वीज कोसळून मुक्ताईनगर तालुक्यातील तरुण जागीच ठार

अन्य दोघे जखमी 

Admin by Admin
September 21, 2022
in जळगाव
0
वीज कोसळून मुक्ताईनगर तालुक्यातील तरुण जागीच ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
वीज कोसळून मुक्ताईनगर तालुक्यातील तरुण जागीच ठार; अन्य दोघे जखमी

मुक्ताईनगर  – जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्या घटना घटना घडत असून आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने वीज अंगावर पडून एका शेतात काम करणाऱ्या शेत मजूर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना उचंदे शिवारात घडली असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शत्रुघ्न काशिनाथ नमायते (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.

   याबाबत, शत्रुघ्न मायते हा आज दुपारी उचंदे शिवारातील माणिकराव पाटील यांच्या शेतात रोजंदारीने कामावर गेला असता त्यांच्या अंगाव वीज पडल्याने तो जागीच ठार झाला तर शेतमालक माणिकराव पाटील यांचा मुलगा गणेश पाटील व एक अन्य मजुर मुकेश पाटील हे दोघे भाजले गेले. संकेत पाटील व अमोल नमायते यांनी जखमींना तातडीने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले.
मयत शत्रुघ्नच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा भावेश वय १२, एक मुलगी वेदिका वय ६ असा परीवार असून कुटुंबातील कमवता प्रमुख गेल्याने कुटुंबावर प्रचंड आघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Post

मुक्ताई मंदीर नव्हे, परिसरातील विठ्ठल मंदिर व तुळजा भवानी मंदिराच्या दान पेट्या जातात कुठे असा सवाल असताना शब्दाचा विपर्यास केला – आमदार चंद्रकांत पाटील 

Next Post

वीज पडून ठार झालेल्या मयताच्या वारसांना २४ तासाचा आत भरपाई !

Admin

Admin

Next Post
वीज पडून ठार झालेल्या मयताच्या वारसांना २४ तासाचा आत भरपाई !

वीज पडून ठार झालेल्या मयताच्या वारसांना २४ तासाचा आत भरपाई !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group