विश्वपट ब्रम्हदोरा | संत मुक्ताई साहेबांच्या दरबारात भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी
संत मुक्ताईनगर :
भाऊबीजे निमित्त ज्ञानदाकडची साडी चोळी मुक्ताईने केली परीधान
मुक्ताईनगर : बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच भाऊबीज हा कार्तिक द्वितिया (यमद्वितीया) हा दिवाळीतला चौथा दिवस हिंदूधर्मीय साजरा करीत असलेला एक महत्वपुर्ण सण आहे. हिंदीत याला भाईदुज म्हणतात. या पवित्र सणाने बहीण भावाचे नाते जपत आळंदी संस्थान कडुन म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींकडुन बहीणीस म्हणजेच संत मुक्ताबाई ला दिवाळी व भाऊबीजेची भेट म्हणून साडी, चोळी आली होती. ही साडी चोळी बुधवारी भाऊबीज मुहूर्त दि.१५ नोव्हेंबर रोजी विधिवत पुजा करुन जूनी कोथळी समाधी स्थळ मंदिरात आदीशक्ती मुक्ताबाईस नेसविण्यात आली. तर आपेगाव येथील आलेली साडी चोळी नवीन मुक्ताई मंदीरात आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांना नेसविण्यात आली. यावेळी साडे सातशे वर्षांनी देखील बहीण भावाचे यानिमित्ताने दिसून आले तर आई साहेब संत मुक्ताई साहेबांचे फोटो व्हिडिओ घेतांना नेहमी असणाऱ्या चेहऱ्यात आणि आजच्या चेहऱ्यात खूप फरक दिसून आला तर आई साहेबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमच्या देखील अंगावर शहारे आले . आपण ही मुक्ताई वार्ता च्या माध्यमातून हा सोहळा पाहून संतांची भाऊ बीज पाहण्याचा आनंद घ्यावा ही विनंती आम्ही आपल्यापर्यंत अशाच अपडेट बातम्या घेवून येत असतो यासाठी आपले लोकप्रीय मुक्ताई वार्ता मराठी न्युज YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हि विनंती.
दिपावली पर्वातील भाऊबीजेचे सणा निमित्त श्रीमंतसंत ज्ञानीयांचे राजे लडिवाळ बंधू माऊली ज्ञानेश्वर महाराज कडून आलेली साडीचोळी आज बहीण आदिशक्ती संत मुक्ताईला जूनी कोथळी समाधी स्थळ येथे विधीवत पूजा करून परिधान केली. तसेच नवीन मंदिरात आपेगाव येथून म्हणजेच आई साहेब मुक्ताई साहेबांच्या जन्मस्थाना वरून विश्वस्त मंडळी आलेली होती त्यांच्या हस्ते विधीवत पूजा करून संत मुक्ताई ला साडी चोळी परिधान करण्यात आलेली आहे.
भाऊबीजेला भाऊ बहीणकडे जावून ओवाळण्याची परंपरा टिकून आहे. तीच परंपरा पुढे नेत श्री संत मुक्ताई संस्थानकोथळी- मुक्ताईनगरला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांचेकडून आषाढी वारीत माऊली व मुक्ताई यांचे ह्रदगत भेटीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष श्री अजित कुलकर्णी यांचे हस्ते दिलेली साडीचोळी आज भाऊबीजेच्या पर्वावर संस्थानचे अध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी पहाटेच्या काकडा आरती भजन व मंत्रोपचार अभिषेक पूजन करून विधीवत नेसवली. पौराहीत्य हभप. रविंद्र महाराज हरणे यांनी केले. याप्रसंगी गोकुळ चौधरी यांचे हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली
आपेगाव संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर ,भागवत पाटील यांचेसह आपेगाव येथील इतर मंडळी तसेच पुरुषोत्तम वंजारी,ज्ञानेश्वर हरणे, राम जुनारे यांचेसह असंख्य भाविकभक्त उपस्थित होते.