रावेर तालुक्याची नविन संगायो समिती गठीत ! अध्यक्षपदी दिनेश (छोटू) गंभीरराव पाटील यांची वर्णी
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुचविलेल्या नावांप्रमाणे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार रावेर तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात आली असून समिती नियुक्तीचे अधिकृत पत्र जळगांव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या स्वाक्षरी निशी रावेर तहसील कार्यालयाला दि.१० जुलै २०२३ रोजी प्राप्त झाले आहे.
संगायो समिती खालील प्रमाणे झाली गठित :
अध्यक्ष – दिनेश (छोटू) गंभीरराव पाटील (रा. रेंभोटे)
सदस्य – प्रवीण राजू मोरे (रा.तांदलवाडी)
सदस्य – सुलोचना यशवंतराव पाटील, (रा.मोरगांव)
सदस्य – किशोर जगन्नाथ पाटील, (रा. वाघोदा)
सदस्य – सुभाष सुखदेव सपकाळे, (रा. सूनोदा)
सदस्य – राजन भरत लासुरकर, (रा. खिरवड)
सदस्य – मयुर अनिल पाटील (रा. केऱ्हाळा)
सदस्य- फिरोज खान अब्दार खान, (रा.सावदा)
सदस्य – अमोल सुरेश पाटील ( रा.कोचुर बु.)
सदस्य – पद्माकर काशिनाथ महाजन (रा.रावेर)
तसेच प्रशासकिय सदस्य म्हणून रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून रावेर तहसीलदार अशी समिती गठित करण्यात आलेली आहे.