• “रक्षाबंधन संतांचे , जतन संस्कृतीचे”
• जपावे बंधनास निरामय भावनेने जसे जपले
निवृत्ती,ज्ञानेश्वर, सोपान ,मुक्ताईने !
• विश्वपट ब्रम्ह दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।
युट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
फेसबुक व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
मुक्ताईनगर : येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, तसेच संत निवृत्तीनाथ व संत सोपानकाका यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा जोपासली जात असून बहीण भावाचे ते निरामय नाते जोपासले जावुन चालत आलेली पूर्वापार संस्कृती टिकविण्याचे प्रयत्न चौघ बहीण भावंडांच्या धर्म स्थळावरून होत आहेत. तर तिघे भावंडांकडून देखील आई साहेब मुक्ताईस साडी चोळी भेट देऊन बहीण मुक्ताई चा सन्मान केला जातो हे विशेष.
योगिराज चांगदेव महाराज यांच्या तपोभूमीने पावन झालेल्या चांगदेव भूमिमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांचे मंदिर असून हाकेच्या अंतरावर विश्व गुरू संत निवृत्तीनाथ महाराज यांना संत मुक्ताई ची राखी बांधून संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष व विश्वस्थाच्या वतीने संस्कृती जतनाची पंरपरा कायम जोपासली जात आहे..
बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन.
राखी या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय, तसेच संत निवृत्तीनाथ व सोपानकाका यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा याही वर्षी संस्थानने कायम ठेवले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे दरवर्षी संत मुक्ताबाई संस्थानकडून आपल्या तीनही भावंडांना राखी पाठविली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा संस्थानने कायम ठेवली असून, मुक्ताई संस्थांकडून बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्याने ही संस्थाने केवळ जोडली गेलेली नसून, प्रेमाचा ओलावाही निर्माण झाल्याची माहिती संत मुक्ताई, मूळ मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज यांनी सोहळ्याप्रसंगी दिली.
आळंदी येथे संत ज्ञानोबा माउलींना व सासवड येथे संत सोपान काकांना , संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, सत पंथ चे महंत जनार्दन महाराज, संदिप पाटील , सौ.अंकिता संदीप पाटील, विशाल महाराज खोले यांनी आईसाहेब मुक्ताई साहेबांची राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
तर संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान , त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त सम्राट पाटील यांनी राखी बांधली व चांगदेव येथील संत निवृत्तीनाथ मंदिर येथे संत मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव जूनारे महाराज , पुरुषोत्तम वंजारी , सौ ममता वंजारी , माझी माउली युट्यूब चॅनल चे ceo गणेश आढाव यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.