या ठिकाणी जाळला शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचा पुतळा !
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलेच तापलेले असून आदित्य ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आरोप करतांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने , जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर येत प्रवर्तन चौकात आदित्य ठाकरेंचा पुतळा जाळून निषेध केला व माफीची मागणी केली आणि भविष्यात तोंड सांभाळून बोलावं असा इशाराही दिला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, तालुका प्रमुख नवनीत पाटील , शहर प्रमुख प्रशांत टोंगे , शहर संघटक वसंत भलभले, युनूस खान ,विनोद पाटील, सतीश नागरे, अमोल पाटील, नरेंद्र गावंडे, जावेद खान, संतोष माळी, नारायण पाटील, गणेश पाटील, राहुल धनगर, राजेंद्र कापसे आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
पहा अल्पसंख्यांक आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान काय म्हणाले ?
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी Muktai Varta | मुक्ताई वार्ता या आमच्या युट्यूब वरील चॅनल ला भेट द्या , वेबसाइट वरून डायरेक्ट YouTube channel connect व्हा ही विनंती.