मेंढपाळ बांधवांकडून आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार !
पारंपरिक काठी, घोंगडे सप्रेम भेट देवून केला सन्मान
मुक्ताईनगर : पावसाळी वातावरणामुळे मेंढयांवर लाळखोरी सारखे साथीचे रोग येऊन मेंढ्या मृत्युमुखी पावत असतात. यामुळे या पशुधनावर उदर निर्वाह करणाऱ्या मेंढपाळ धनगर व ठेलारी समाज बांधव खूप मोठ्या आर्थिक संकटात येत असतात. ही गंभीर बाब लक्षात घेवून सुमारे 50,000 च्या वरील शेळी मेंढी पशुधनासाठी लाळखोरी लसीकरण मोहीम आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातुन व्यापक प्रमाणात राबविली गेली व अजूनही ही लसीकरण मोहीम सुरू असून एक जागरूक लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी उभा राहिल्याने तालुक्यातील हजारो मेंढपाळ बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवास स्थानी येवून आ. पाटील यांचा पारंपारिक घोंगडी, काठी व फेटा घालून सत्कार केला व व्याग्र प्रकल्पात मेंढपाळ व गुरांसाठी काही क्षेत्र आरक्षित ठेवण्याचे निवेदन यावेळी मेंढपाळ बांधवांनी दिले.
यावेळी पुंडलिक सरक, नवनीत पाटील, राजेंद्र हिवराळे,पंकज राणे, राजू तळेले, सचिन पाटील , महेंद्र मोंढाळे , संतोष मराठे , मुकेश वानखेडे यांच्या सह मेंढपाळ बांधव यांची संख्या हजारोंच्या संख्येत होती.