मुळ मंदिरात संत मुक्ताई साहेबांना महालक्ष्मी मातेचा रूप शृंगार !
मुक्ताईनगर : आदिशक्ति मुक्ताई साहेबांचा वैशाख कृ. दशमी ला तिरोभुत अंतर्धान समाधी सोहळा नाम जप टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर सोमवारी दि.१५ मे रोजी असलेल्या अपरा एकादशी ला पंढरीश परमात्मा पांडुरंग पादुका पालखी सोहळा प्रमुख मेघराज महाराज वळखे व राम जुनारे , राम व्यवहारे यांच्या संकल्पनेतून आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा पूजा अभिषेक झाल्यावर अतिशय मनमोहक शृंगार करण्यात आला व यातून एक अतिशय सुंदर असे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे स्वरूप च आदिशक्ति मुक्ताई साहेबांमध्ये दिसून येत होते. आलेल्या हजारो भाविकांतर्फे आई मुक्ताई याच शृंगारात राहावी अशी भक्तिमय भावना केली जात होती. तसेच दिवसभरात सोशल मिडीयात व्हायरल झालेल्या पोष्ट प्रत्येकाचे स्टेटस आणि पोष्ट वर आदिशक्ती मुक्ताई साहेबांचे नवे रुपडे दिसून येत होते.






“सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायनी!
मंत्र मुर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते!!
आध्यंतरहीते देवी आद्य शक्ति महेश्वरी!
योगजे योग सम्भुते महालक्ष्मी नमोस्तुते!!”
अशी मंत्रपुष्पांजली आज हजारो वेळा आईसाहेब मुक्ताई यांचे वरून ओवाळून टाकावी अशी प्रत्येक भाविकांची इच्छा होत होती.
दरम्यान , मुक्ताई वार्ता ने याबाबत अधिकृत माहिती मुळ मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जूनारे यांच्याकडून घेतली व दिवसभरात व्हायरल झालेल्या मुक्ताई साहेबांच्या शृंगार करण्यात आलेल्या फोटो मागचे रहस्य उलगडले. तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट करून नक्की कळवा व ही बातमी आपल्या स्नेहिजनांना शेअर करायला विसरू नका ही विनंती.