मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील मंदिरामध्ये होणार महापूजा ;
धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा संकल्प !
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचे पाईक असलेले हिंदू धर्मप्रेमी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी महाराष्ट्रातील सकल मंदिरे व प्रार्थना स्थळांमध्ये उद्या दि ९ फेब्रुवारी २०२३ रोजी महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी संकल केला असून बाळासाहेबांची शिवसेना ,युवासेना महिला आघाडी , धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक संकल्प सिद्धीस नेणार आहेत.
दरम्यान , या संदर्भात धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले त्यांचे फेसबूक पेजवरून आवाहन केलेले.