मुख्यमंत्री,पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शेवटच्या गावापर्यंत शिवसंपर्क अभियान राबविणार
संपर्कप्रमुख विलास पारकर ; नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक
मुक्ताईनगर : जळगांव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात शिवसैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. विरोधकांना रोखायचे असेल तर भक्कम कार्यकर्ते घडविणे गरजेचे आहे. सेना भवनातून पक्ष निरीक्षक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तालुका स्तरावर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यात येतील अशी माहिती दि.२२ मे रोजी सकाळी ११ वा.
मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेनेचे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी दिली. बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती.
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या आयोजनासाठी मुक्ताईनगर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यापुढे बोलतांना पारकर यांनी निवडणूका जिंकण्यासाठी गावागावात शिवसैनिकांची फळी तयार करण्याचे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसंपर्क अभियानांतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रात मतदार संघ निहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्येक गटागटात जाऊन शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यात येतील. गाव तिथे शिवसेनेची शाखा उघडण्यात येईल. संपूर्ण लोकसभा क्षेत्र भगवामय करून शिवसंपर्क अभियान यशस्वी करणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रांतील पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. सुरवाडे यांनी मानले.