मुक्ताई मंदीर नव्हे, परिसरातील विठ्ठल मंदिर व तुळजा भवानी मंदिराच्या दान पेट्या जातात कुठे असा सवाल असताना शब्दाचा विपर्यास केला – आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : काल दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत शब्दांचा विपर्यास करून बातम्या छापून मुक्ताई मंदिराचा उल्लेख केला याबद्दल खुलासा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
त्यांनी मुक्ताई वार्ता शी बोलताना सांगितले की, आदिशक्ती मुक्ताई कोथळी मंदिर परिसराचा शासनाच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजने अंतर्गत विकास होत असताना ज्या शासकीय निधीमधून जुने मुक्ताई मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर, विठ्ठल मंदिर व मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम झालेले असून या मंदिरात असलेल्या दानपेट्या व त्याच्या बाजूला असलेले मल्टीपर्पज हॉल ची येणारी देणगी यातून मंदिराची व हॉलची देखभाल दुरुस्ती साठी सदरचा निधी वापरला गेला पाहीजे परंतु तसे नव्हता दोघं मंदिराच्या दानपेट्या व सभागृहाचे देणगी स्वरूपातील निधी हा एक विशिष्ट व्यक्तीकडे जातो हे माझ्या माहितीत आहे काही पत्रकारांनी या शब्दाचा विपर्यास करून मुक्ताईच्या दानपेट्या अशा शब्दांमध्ये वृत्त छापले परंतु माझे वारकरी व तीर्थक्षेत्र मुक्ताई संस्थान ची बदनामी होईल असा कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही तरी भविष्यात या तीर्थक्षेत्र परिसरातील जो काही दानपेट्यातील निधी असेल यातून मंदिराची व सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात यावा हा माझा प्रामाणिक व शुद्ध हेतू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिर व विठ्ठल मंदिरातील दानपेट्यातील पैसे एका विशिष्ट व्यक्तीकडे जात असल्याचा हा संताप जनक प्रकार थांबवला पाहिजे ही माझी व असंख्य वारकऱ्यांची प्रामाणिक इच्छा आहे तीच मी बोलून दाखवलेली आहे तसेच या ठिकाणी जास्तीत जास्त तीर्थक्षेत्र पर्यटन विकास निधीतून कामे व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे मी आदिशक्ती मुक्ताई चा वारकरी असल्यामुळे मला मुक्ताई प्रती खूप श्रद्धा आहे.असे
आ.चंद्रकांत पाटिल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.