मुक्ताई एक उर्जा….
आदिशक्ती संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व संत चांगदेव या महान विभूती ना बोध (उपदेश) देण्याच्या अधिकारी महान संत या भूमंडळी होऊन गेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर अतिशय उद्विग्न झालेल्या संत मुक्ताबाई तिर्थाटन करीत असतांना तेव्हाचे महतनगर आताचे मुक्ताईनगर येथे तापी पूर्णा चे संगम स्थळी शके १२१९ वैशाख वद्य दशमीला एका विजेच्या कडकडाटाच्या सहाय्याने अंतर्धान पावल्या आज या घटनेला म्हणजेच दि.२५ मे रोजी वैशाख वद्य दशमी असल्याने या दिवशी बरोबर ७२५ वे वर्ष पूर्ण होत आहे.त्यामुळे आदिशक्ति मुक्ताई समाधी स्थळ, कोथळी – मुक्ताईनगर येथे संस्थानचे अध्यक्ष ऍड रविंद पाटील यांनी संकल्प केला होता की या सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात अखंड कथा , कीर्तन, संत चरित्र , हरिपाठ व काकडा अविरत पणे सुरू रहावा यासाठी त्यांनी मुक्ताई वर श्रद्धा असलेल्या सर्व परंपरेच्या दिंडी सोहळे व वारकऱ्यांना आवाहन केले होते. यानुसार
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अलंकार शोभती सकळ ।
या उक्ती प्रमाणे गेल्या वर्ष भरापासून येथे कथा,किर्तन , पारायण , नाम जप, हरिपाठ , काकडा , प्रवचने नव्हे नव्हे तर दररोज नाश्ता, सकाळ, संध्याकाळ ची पंगत आदी सेवा एक दिवसाचा ही खंड न पडता अविरत पणे सुरू आहे. अशी सेवा होत की याची नोंद नक्कीच वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये झाली पाहिजे.असो दि १९ मे २०२२ गुरुवार पासून या सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सप्ताह सोहळ्याचा कळस सप्ताह सुरू झालेला असून नामांकित कीर्तन कारांच्या वाक पुष्पा ची मेजवानी वारकरी भाविकासांठी येथे सुरू झालेली असून एक भक्तीची अलौकिक उर्जा येथे अनुभवास मिळत आहे.
वर्षभरातील सर्व सप्ताह यशस्वी होणे साठी संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद पाटील , संत मुक्ताई सोहळा पालखी प्रमुख ह भ प रवींद्र हरणे महाराज, जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज, नवीन मंदिर व्यवस्थापक विनायक हरणे महाराज, विश्वस्त पंजाबराव पाटील व समस्त विश्वस्त, फडवरील किर्तनकार , टाळकरी भाविक व वारकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
“आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मुक्ताईनगर तालुक्याला अध्यात्मासह ऐतिहासिकतेची “ऊर्जा” आहेच सोबत तापी – पुर्णा पवित्र संगमासह मुबलक पाण्याचे अस्तित्व असल्याने जलऊर्जेची देणगी तालुक्यास लाभली आहे. तर सातपुड्याच्या पर्वत रांगा व घनदाट वनराई असलेले जंगल यामुळे भौगोलिक ऊर्जेसह नैसर्गिक सौंदर्य तालुक्याला लाभले असुन वन्य पशु पक्ष्यांच्या किलबिलाटासह निसर्गप्रेमींना आकर्षीत करणारी अलौकिक ऊर्जा येथे निसर्गाने बहाल केलेली आहे. त्यामुळे ऊर्जा हे समिकरण म्हणजेच मुक्ताईनगर असे बनलेले आहे.”
शके १२१९ ला वैशाख वद्य दशमीला तालुक्याच्या दृष्टीने इतिहासात एक अलौकिक घटना घडली या दिवशी वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरादी चौघ भावंडातील लाडाची बहीण आदिशक्ती संत मुक्ताई ह्या तापी – पुर्णा नदीच्या संगमावर स्नान करुन अंतर्धान (गुप्त) झाल्या, या समयी आकाशात विजेचा कडकडाटासह त्या गुप्त झाल्याची इतिहासात नोंद आहे.
“कडाडली निरंजनी जेव्हा, मुक्ताई गुप्त झाली तेव्हा !”
त्यामुळे संत मुक्ताई चा वारसा या तालुक्याला लाभला आहे. आणि नव्हे नव्हे अनेक संतांच्या चरण कमलांनी हा परिसर पवित्र केलेला आहे. आणि याचमुळे तालुक्याला ” आध्यात्मिक ऊर्जेची “जोड आहे. आणि याच ऊर्जेची अनुभूती मुक्ताईनगर करांना आहेच येथे मोठ मोठे नैसर्गिक संकटे थोपविल्याने संत मुक्ताई चा आधार असल्याची जाणीव अनेकदा झालेली आहे . त्यामुळे भाविकांत या ऊर्जेचा नितांत आदर आहे. तर शास्त्रीयदृष्ट्या अनेकांनी हे मान्य सुद्धा केलेले आहे.
जलउर्जा :
तसेच तालुक्याला तापी व पुर्णा नदीच्या अस्तित्वाने जलऊर्जेचीही देणगी लाभलेली आहे. या ऊर्जेला खरी किमया दिली स्व. मधुकरराव चौधरी यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून हतनुर धरणाची निर्मिती झाली . व याच मुळे तालुक्याचा मोठ्या प्रमाणावरचा भूभाग बॅक वाटरच्या अधिपत्याखाली आल्याने परीसरात केळी , कपाशी , धान्ये, फळे यासारखी बागायती शेती बहरण्यास मोलाची मदत झाली व तालुक्यातील हजारो शेतकरी सधन बनण्यास मदत झाली तर परीसर दिवसेंदिवस सुजलाम् सुफलाम् होत आहे आहे तो फक्त जल ऊर्जे मुळेच तालुक्याचा विकास होत आहे.
सातपुड्याची व वनाची उर्जा :
तालुक्याच्या उत्तर व पुर्वेस सातपुडा पर्वतरांगांची मजबुत पाठराखण असल्यामुळे नैसर्गिक आपत्कालीन संकटे थोपविण्याची भौगोलिक ऊर्जा शक्ती आहे. तसेच तालुक्याच्या विविधतेत भर टाकणारी मोठ्याप्रमाणावर अभयारण्याची देणगी तालुक्याला प्राकृतिक उर्जाच लाभली आहे. येथे वडोढा वनक्षेत्रात वाघ, हरीण, चितळ,नीलगाय, अस्वल तसेच इतर वन्य पशु पक्षी यांचा मुक्त संचार या परीसरात असल्यामुळे तालुका नैसर्गिक ऊर्जेनेच प्राकृतिकरीत्या नटलेला आहे .यासह तालुक्याच्या चारही बाजूंनी वन विभागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागात वन जडी बुटी औषधीचे भंडार देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने बहुसंख्य आदिवासी बांधव या भागातील वन औषधी वर मोठ मोठ्या शहरात तसेच देवस्थान वर व्यवसायाच्या माध्यमातून उदर निर्वाह करीत असतात.
तालुक्याच्या सातपुडा लगत च्या परीसरात अनेक हेमाडपंथी मंदिरे उदा. चारठाना जवळील भवानी मंदिर हे हेमाडपंथी असल्याचे दिसून आले आहे. तर गोरक्षनाथ यांचं तपोभूमी गुफा हे देखील याभातील विशेष स्थळ आहे.