मुक्ताईनगर शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी नितीनकुमार उर्फ बंटी जैन यांची नियुक्ती !
मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रागृह येथे शनिवारी दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदरील बैठकीत सर्वानुमते नितीनकुमार उर्फ बंटी जैन यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, मुक्ताईनगरच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच बैठकीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सर्वांगीण सहभागातून थाटात साजरा करण्यात येणार असल्याची चर्चा झाली . तसेच मुक्ताईनगर शहरात यंदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याने गाव खेड्यातून शिव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्या धर्तीवर नियोजन करण्यात येत आहे. तरी सर्वांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवनियुक्त उत्सव समितीचे अध्यक्ष नितीनकुमार जैन यांनी केले आहे.
यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष आनंदराव देशमुख, दिनेश कदम(मराठा सेवा संघ वसतिगृह राष्ट्रीय अध्यक्ष), नितीन (बंटी) जैन (व्यापारी आघाडी अध्यक्ष,मुक्ताईनगर), देवानंद वंजारी, किरण महाजन, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी, प्रफुल्ल पाटील, छोटु भोई (शिवसेना जिल्हा उपप्रमुख) , शिवराज पाटील (शिवसेना सोशल मिडिया जिल्हाप्रमुख), नगरसेवक डॉ.प्रदिप पाटील, नगरसेवक युनुस खान, हकिम चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम मनियर बिरादरी), गणेश टोंगे (शिवसेना शहर प्रमुख), संतोष माळी, कैलास वंजारी,संदीप पाटील, गणेश पाटील, जितेंद्र मुर्हे, प्रकाश गोसावी, प्रवीण डहाके ,कृष्णा पाटील,सोपान मराठे आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली शिवजयंती उत्सवाची रूपरेषा –
शिवजयंती उत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी शिवजयंती उत्सवाच्या पूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेऊन रूपरेषा जाणून घेतली व पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याबाबत सर्व शिवप्रेमींना आश्वस्त केले.


