मुक्ताईनगर शहरात निघाली उमेद अभियानातील महिला बचत गटाची ७५ फुटी लांब तिरंगा रॅली !
महापुरुषांचे सजीव देखावे व तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष !!
मुक्ताईनगर : पंचायत समिती कार्यालय येथुन आझादी का अमृत महोत्सव निमित्त ‘उमेद’ अभियानातील बचत गटाच्या महिलांनी सुमारे ७५ फुट लांब तिरंगा ध्वज तयार करून त्याची मिरवणूक ( रॅली ) दि. १२ जुलै शुक्रवार रोजी काढली या मिरवणुकीमध्ये महापुरुषांसह देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा पेहरावासहित सजीव देखावा करण्यात आला होता. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ, मासाहेब लोकमाता अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे , झाशी की राणी अशा पद्धतीने वेशभूषा करण्यात आली होती.
या कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे उमेद’ अभियानातील बचत गटाच्या महिलांची
उपस्थिती होती. सदर मिरवणुकीत शेकडो महिलांचा सहभाग होता सदर मिरवणुकीत मध्ये मुक्ताईनगर नगरपालिकेतील सर्व नगरसेवक व कर्मचारी व मुक्ताईनगर येथील पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी , मुक्ताईनगर पंचायत समिती कर्मचारी आदिंचाही रॅलीमध्ये सहभाग होता, महिलांसोबत तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, पोलीस निरीक्षक शंकर शेळके ,मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, एपीआय प्रदीप शेवाळे, उपनिरीक्षक राहुल बोरकर ,उपनिरीक्षक प्रविणा तडवी, ट्राफिकचे पोलीस हवालदार मोजेस पवार, ट्राफिक नंदू धनके आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सदर मिरवणुकीत महिलांसाठी चहा व पाणीची व्यवस्था ग्राम सुरक्षा दलाकडुन करण्यात आली.ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम, हकिम चौधरी , मोहन मेढे,सचिन पाटिल यांनी सहकार्य केले व सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका उमेद अभियान व्यवस्थापक पवन सुरडकर, माधुरी भुरे, सिमा शेवाणे, प्रिया वाडेकर व सर्व उमेद क्रेडर यांनी परिश्रम घेतले.
***********************
असा होता मिरवणूक मार्ग :
पंचायत समिती कार्यालय ते तहसील रोड ते आय सी आय सी आय बँक ते प्रवर्तन चौक , बस स्टँड, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर ते तहसील कार्यालय अशा स्वरूपात मुक्ताईनगर मध्ये ७५ फुटी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती.