मुक्ताईनगर येथे शिवसेना शिवसंपर्क अभियानांतर्गत महिला आघाडीच्या रणरागिणींशी संवाद !
रावेर लोकसभा संपर्क प्रमुख उषाताई मराठे(मुंबई) यांची होती प्रमुख उपस्थिती
मुक्ताईनगर : शिवसेना शिवसंपर्क अभियानांतर्गत आज रावेर लोकसभा शिवसेना महिला आघाडी संपर्क संघटक उषाताई मराठे यांनी मुक्ताईनगर येथे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि महिला आघाडीच्या रणरागिणींशी संवाद साधून ठाकरे सरकारचे काम व योजना घराघरापर्यंत पोहचवण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा संघटिका कल्पनाताई पालवे, तालुका संघटीका शोभाताई कोळी, शहर संघटिका सरिताताई कोळी, नगरसेविका तथा महीला व बाल कल्याण सभापती सविताताई भलभले यांच्यासह असंख्य महिला आघाडी पदाधिकारी व आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.