मुक्ताईनगर येथे व्यापारी संकुल मंजूर ; व्यापारी संघटनेतर्फे फटाके फोडून जल्लोष !
व्यापाऱ्यांनी भावना व्यक्त करीत आमदार चंद्रकांत पाटील यांचे मानले आभार
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील मोठ्या व्यावसायिकांपासून ते छोट छोट्या व्यावसायिकांसाठी दिवा स्वप्न ठरलेले , तसेच वारंवार कारवाईचा हातोडा चालल्याने व्यवसाय व धंद्यात पूर्णपणे कोलमडलेल्या व्यापाऱ्यांसाठी दिवा स्वप्न ठरलेले व्यापारी संकुल (कॉम्प्लेक्स) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाल्याची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी प्रवर्तन चौकात येवून फटाके फोडले व जल्लोष साजरा करीत आमदार पाटील यांचे आभार मानले.
मुक्ताईनगर शहरातील तत्कालीन चौकात मुख्य बाजार पेठ होती. शेकडो लोकांचा उदर निर्वाह होत होता. परंतु तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वात पहिला हातोडा सन १९९९ च्या चालला होता यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले होते. आजही त्या व्यापारी टपरी टाकून उदर निर्वाह करीत आहेत. दरम्यान मध्यंतरी कोणतेही व्यापारी संकुल मंजूर नसताना पोलिसांच्या दंडूक्याचा वापर करून व व्यापारी संकुल आणू दुकान देवू अशा खोट्या बाता मारून व्यापाऱ्यांची हेळसांड करण्यात आली. तसेच एक वेळा एका लहान मुलाचा बळी गेल्याने अतिक्रमणावर ठपका ठेवत अतिक्रमण उठविण्याची कारवाई करण्यात आली होती . तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली होती. वारंवार होणाऱ्या कारवाई तत्कालीन ग्रा.पं तसेच की विद्यमान नगरपंचायत असेल अतिक्रमण काढण्याची कारवाई साठी लाखो रुपये खर्च गेले परंतु व्यापाऱ्यांच्या नशिबी मात्र दुर्भग्याच आले होते. कुटुंबांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न असल्याने व्यापारी असतील छोटे छोटे व्यावसायिक असतील यांना पुन्हा हातगाडी किंवा टपरी टाकून अतिक्रमण, व्यवसाय करण्याशिवाय येथे पर्यायच नव्हता . व्यापाऱ्यांची होणारी ही हेळसांड आमदार चंद्रकांत पाटील यांनी अगदी जवळून अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी या प्रश्नी पाठपुरावा सुरू ठेवला होता . आज या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले असून दि.२५ जुलै २०२२ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात मुक्ताईनगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून दिवा स्वप्न ठरलेल्या व्यापारी संकुल (कॉम्प्लेक्स) ला ४ कोटी रुपयांच्या निधी सह मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती मिळताच व्यापाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी चक्क प्रवर्तन चौकात येवून फटाके फोडून जल्लोष साजरा केला. व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या मूळ मागणीला प्राधान्य दिल्याने त्यानी आमदार पाटील यांनी आभार मानले.
मुक्ताईनगर व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीनकुमार उर्फ बंटी जैन, मधुकर भोई, रविंद्र पाचपोळ, योगेश सोनार, सुनील गोमटे, संजय ठाकूर, अर्जुन भोई, कांतीलाल जैन, प्रवीण जैन, विठ्ठल तळेले, रफिक चांद, संतोष बोराखेडे, धनराज सापधरे, सुधाकर कोळी, यांच्यासह असंख्य पान टपरी चालक , हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला व फळविक्रेते उपस्थित होते